हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळातर्फे ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा
द्वारका :- सलाबाद प्रमाणे हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळातर्फे शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल या ठिकाणी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सार्वजनिक रित्या ध्वजारोहण करून भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे संतोष नरुटे,पीसआय जितेंद्र वाघ, यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित बालगोपाळांना खाऊचे वाटप करण्यात आले. कातारी शिकलकर नाशिक जिल्हा नेते श्री सोमनाथ भोंड यांच्या वाढ दिवसानिमित्त शाल फुल देवून सत्कार करण्यात आला.
या राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, श्याम पवार, प्रसाद बावरी, किरणसिंग पवार, प्रताप पवार बावरी, राजेंद्र नेरकर, महादू बेंडकुळे, अनिल जाधव, समाधान निकम, धर्म गोविंद, विजय पवार, अतुल रणशिंग, नितीन काथवटे, अशोक गांगुर्डे, राजू गाडगीळ, राजेश धुमाळ, सुनील साळवे, स्वप्नील काथवटे, संजय पवार, नाना अहिरे,मंगल भाटी,चांद शेख,भूषण सदभैय्या, किशोर आचारी, विक्की आचारी, अंगणवाडी सेविका कुमारी मंगला पवार, सौ सरला झोटिंग, सौ अनिता पगारे, कुमारी प्रीती बावरी, सौ छानाबाई बावरी,जयश्री सद् भैय्या आदींसह अंगणवाडीतील व परिसरातील बाल गोपाळ व शाळेतील मुले मुली तसेच पक्षाचे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले.
Comments
Post a Comment