लासलगाव महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन मोठ्या उत्साहात साजरा

लासलगाव :-  येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने आदिवासी क्रांतिकारक थोर समाजसेवक बिरसा मुंडा आणि थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. रासेयो विभागातर्फे क्रांती दिनानिमित्त थोर स्वातंत्र्य सैनिक व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक  उज्वल शेलार लता तडवी प्रमुख वक्ते होते. श्रीमती लता तडवी यांनी आपल्या मनोगतातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने पुढे आणण्याचे कार्य केले. जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे, आणि त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे हा आदिवासी दिन साजरा करण्यात पाठीमागचा प्रमुख उद्देश आहे. तसेच श्री.उज्वल शेलार यांनी क्रांतीकारकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. त्यांनी क्रांती दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना स्वातंत्र्य संग्रामात अनेक थोर पुरुषांनी, क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. 9 ऑगस्ट ची क्रांती खऱ्या अर्थाने जनतेचा उठाव होता. 9 ऑगस्ट 1942 च्या चळवळीत सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीसह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘९ ऑगस्ट’ हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या युवकांनी या इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि आपले उज्वल भविष्य घडवावे. असा संदेश दिला. यापुढेही आपल्याला हे कार्य अधिक जोमाने करावयाचे आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या युवक-युवतींनी राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंप्रेरणेने सामील होऊन आपल्या देशाच्या सेवेस, समाज कार्यास आणि प्रगतीस योगदान द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास पर्यवेक्षक उज्वल शेलार, रासेयो कार्यक्रम अधिकारी  सुनिल गायकर, दीपाली कुलकर्णी, लता तडवी, अश्विनी पवार, जयश्री पाटील, प्रभाकर गांगुर्डे, रामसिंग वळवी, मोहन बागल,  रामनाथ कदम,  महेश होळकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला