बदलापूर सह महिला भगिनी अत्याचार घटनेचा नाशिक मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध आंदोलन
नाशिक :- संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने सीबीएस जवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी,
झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच पश्चिम बंगाल येथे डॉक्टर भगिनीवर झालेल्या अन्याय अत्याचार व बलात्कार व मणिपूर येथे माता भगिनीची काढलेली नग्नधिंड या सर्व घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला ब्रिगेडच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आला. बदलापूर येथील घटनेतील अक्षय शिंदे याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून पोस्टर्स फाडण्यात आले अमानवीय अमानुष कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला जरब बसणे गरजेचे असून केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.बदलापूर येथे चिमुरडीवर झालेला अत्याचार, पश्चिम बंगाल येथील डॉक्टर भगिनी वर अत्याचाराच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टुपके जेऊघाले, मंदा दोडके, तसेच हिरामण वाघ, अनिल आहेर, नितीन रोटे पाटील, करण गायकर, सचिन पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख शरद लबडे, प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, मंदार धिवरे, बळीराम घडवजे, नितीन काळे, महादू नाटे, राकेश जगताप, निलेश गायकवाड, वैभव गायधनी, प्रेम भालेराव, वीर काळे, सौरभ पवार, आयुश सोनवणे, गणेश पाटील, सागर पाटील, योगेश हरक, पप्पू निकम, अनिल ननावरे,
विकास रसाळ, अक्षय आठवले, ललित निरभवणे, राहुल तिडके,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment