अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्यजी, अश्विनी वैष्णव जी, व्ही के सिंह जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या जी, बृजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, सर्व खासदार आणि आमदार, आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे कुटुंबीय!!! देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची ही तार...