फुले दांपत्याच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी फुले चित्रपट अतिशय महत्वाचा - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

फुले चित्रपटाच्या विशेष शो ला फुले प्रेमींची मोठी गर्दी

फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित फुले चित्रपटाचा विशेष शो हाऊस फुल


नाशिक,दि.२८ एप्रिल :- फुले दांपत्याच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास समाजापर्यंत पोहचविण्यासाठी फुले चित्रपट अतिशय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी केले.

महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने नाशिकच्या सिटी सेंटर येथील चित्रपट गृहात फुले चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी या शो चे आयोजन केले होते.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, शहराध्यक्षा कविताताई कर्डक,महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्षा जयश्री काठे, समाधान जेजुरकर, आशा भंदूरे, रवी हिरवे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, नाना साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित याआधी मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहे. आचार्य अत्रे यांनी काढलेल्या महात्मा फुले यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता प्रथमच हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे देशभरात तसेच देशाबाहेर देखील हा चित्रपट बघितला जाईल त्यातून इतिहास समाजापर्यंत पोहचेल. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की स्त्री शिक्षणा सोबतच बालहत्या प्रतिबंध, केशवपण परंपरेला विरोध यासह अनेक महत्वाच्या सामाजिक सुधारणा फुले दांपत्याने केल्या. ज्यावेळी समाजातून तीव्र विरोध होत असताना त्यांनी हा विरोध झुगारून सामाजिक क्रांतीचे पाऊल टाकले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र त्या काळातील इतिहास सर्व समाजापर्यंत जाणे तितकेच आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास केला तरच पुढील वाटचाल ही अधिक सुकर होत असते. त्यामुळे हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला