बागलाण तालुक्यातील धांद्री येथे यात्रे निमित्त कुस्ती दंगल
बागलाण :- तालुक्याती धांद्री येथे श्री राम नवमी च्यानिम्मीत्ताने भव्य यात्रा उत्सव तसेच कुस्ती दंगल संपन्न. मध्यतंरी काही वर्षे बंद पडलेली कुस्ती दंगल परंपरा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.यासाठी गावातील काही युवकानी पुढाकार घेत कुस्ती दंगल परंपरा पुन्हा सुरु करण्यात आली.
श्री राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर प्रभु श्रीरामांच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते.धांद्री गावात व परीसरात दोन श्री राम मंदीर असुन दोन्ही ठिकाणी गावकारी सहभागी होवुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमित्ताने भव्य अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुसरे दिवशी भव्य कुस्ती दंगल भरवण्यात आल्या यावेळी नाशिक जिल्हातील नामवंत पैलवानांच्या कुस्ती सामने झाले.
यावर्षीही यात्रा उत्सव समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीचे अध्यक्ष प्रा.प्रशांत चव्हाण, चंद्रभागा चव्हाण, विश्वास चव्हाण, राजु चव्हाण, अक्षय निकम, गणेश मोरे, नितीन चव्हाण, दावल पगारे, राकेश बस्ते, हर्षल (पैलवान ) चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, नानाजी चव्हाण, संभाजी चव्हाण, सह ग्रामपंचायत सोसायटी सदस्य व गावातील जेष्ठनी कुस्ती उत्सवाचे नियोजन केले.याप्रसंगी लखमापुर पो स्टेशनचे हवालदार खांडेकर, कदम दादा,यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
Comments
Post a Comment