सिमेन्स वर्क्स युनियनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे शालेय साहित्य वाटप
नाशिक - सिमेन्स वर्क्स युनियनच्या वतीने सामाजिक कर्तव्य बांधिलकी या नात्याने नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील कोजोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊ सिमेन्स वर्क्स युनियनचे सेक्रेटरी गिरीश अष्टेकर यांच्या मार्गदर्शना नुसार युनियनचे नाशिक विभाग सचिव प्रशांत तांबट व कमिटी पदाधिकारी प्रितीश केंगे,दयालसिंग जयस्वाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले युनियनचे माजी सचिव अशोक घुगे तसेच नवनिर्वाचित कमिटी पदाधिकारी संजय ठाकुर, देविदास देऊळगावकर, संतोष देशमुख,विनायक होडावडेकर,दामोदर विसे यांच्या व कामगार बंधू यांच्या सहकार्याने वाटप केले.विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक प्रतीक पाटील यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment