आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त डॉ अनिल धनगर यांनी केले शालेय साहित्य वाटप
नांदुरबार:- आपल्या आईच्या प्रथम पुण्यतिथि निमीत्ताने डॉ अनिल धनगर यांनी इतर खर्चाला फाटा देत शालेय विध्यार्थी यांना वह्या पुस्तक दप्तराचे वाटप करुण प्रथम पुण्यतिथि निमित्त आगळी वेगळी श्रद्धांजली अर्पण केली.गाव
बोरद ता तळोदा, जि नंदुरबार, येथे वैद्यकीय श्रेत्रात कार्यरत असलेले डॉ अनिल धनगर यांनी
जि प प्राथमिक शाळा बोरद न १ या शाळेत जाऊन आपल्या आईच्या प्रथम पुण्यतिथी सोहळा शालेय विद्यार्थ्यां बरोबर साजरा करुन सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देवुन पुण्यतिथी सोहळा आगळा वेगळा पद्धतीने साजरा केला.
यावेळी मुख्याध्यापक शाह सर, गिरासे सर, जालसिंग वळवी, गौहिल मॅडम, सतीश पाटील, डोणे सर, दादाजी वळवी, आदिंसह शिक्षक विध्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम राबविल्याने डॉ अनिल धनगर, यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment