सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र, नासिक पोलीस आयुक्तालय संयुक्तपणे कुंभमेळा नियोजन सभा


नाशिक :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्र आणि नाशिक पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यामाने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आय एम आर टी या व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये कुंभमेळा 2027 विषयक नियोजनाबाबत सभा संपन्न झाली.या सभेमध्ये नाशिक शहर व परिसरातील तसेच तालुक्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी, एन एस एस व एन सी सी समन्वयक यांची सभा संपन्न झाली.या सभेला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,यांनी संबोधित केले. पुणे विद्यापीठा तर्फे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी पुणे विद्यापीठाची भूमिका मांडली तसेच एम व्ही पी संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी मार्गदर्शन केले.या सभेचा मुख्य हेतू म्हणजे नासिक मध्ये 2027 मध्ये होऊ घातलेला कुंभमेळा याच्या नियोजनामध्ये नासिक मधील 200 पेक्षा जास्त महाविद्यालये व दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थी तसेच एनएसएस ,राष्ट्रीय छात्रसेना व विद्यार्थी कल्याण मंडळाचे स्वयंसेवक यांना सहभागी करून घेणे हा होता.जी संख्या 15000 पेक्षा जास्त आहे.या वर्क फोर्सचा कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये उपयोग करणे, त्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान याचा उपयोग करणे, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ,क्राउड कंट्रोल, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन, बंदोबस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी प्रास्ताविक पर मनोगतात पोलीस विभागाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांनी मांडल्या.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. प्रशांत सूर्यवंशी, यांनी काम पाहिले .सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले आणि आभार उपकेंद्राचे उपकुलसचिव  श्रीपाद बुरकुले, यांनी मानले. यावेळी पोलीस उपायुक्त खांडवी, प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव, उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन