स्वराज्य रक्षक शुरवीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार सोहळा संपन्न
स्वराज्य शुरवीर जिवाजी महाले समाज भुषण कला पुरस्कार २०२५ सोहळा संपन्न
पुणे :- पिंपरी चिंचवड दिनांक ७/४/२०२५ रोजी स्वराज्य फिल्म प्रोडक्शन आणि स्वराज्य शुरवीर जिवाजी महाले, सोशल फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या भव्य अश्या राज्यस्थरीय फॅशन सांस्कृतिक स्पर्धा तसेच स्वराज्य रक्षक शुरवीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार २०२५ चे पिंपरी चिंचवड येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला राज्याचे नेते लक्ष्मण हाके, विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, यांना राज्यस्तरीय शुरवीर जिवाजी महाले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान यावेळी जिवाजी महाले, यांच्या स्मारकासाठी लागेल ती मदत करायला तयार असल्याचे सांगून लवकरच स्मारकसंदर्भात बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार असल्याचे सांगितले. तसेच नाभिक समाजाच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे विधानपरिषद आमदार उमाताई खापरे,यांनी सांगितले
यामध्ये सामाजिक सेवा पुरस्कारआनंद पिंपळकर, महाराज प्रसिद्ध वास्तु तज्ञ ज्योती विद्या, ज्येष्ठ अभिनेते कलाभूषण पुरस्कार सुनील (नाना )गोडबोले,रामदास सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे,जिवाजी महाले, कार्यप्रसार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधाकर तायडे, यांना राज्यस्तरीय शुरवीर जिवाजी महाले समाज भुषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला सदाशिव खाडे अध्यक्ष नवनगर विकास प्राधिकरण, देवदत्त लांडे नगरसेवक, अनुराधा गोरखे, माऊली थोरात मा नगरसेवक, ज्ञानेश आल्हाट, विशाल वाळुंजकर, प्रबोधनकार श्रद्धाताई मुंडे, अनिताताई वाळुंजकर, मनिषा पाटील,सागर आढाव, हेमंत श्रीखंडे, सचिन सूर्यवंशी, संदीप दळवी, वसंत ढवळे, संदीप महाले, शाम रसाळ, सुशील रसाळ, महादेव मंडलिक, महादेव गंगाधर, मारुती कांबळे, लहू शिंदे, विश्वनाथ जाधव, जितेंद्र चित्ते,विशेष सहकार्य मंगेश कसबे सिद्धार्थ शिंदे राजेन्द्र ठोंबरे आकांशा तांबे अमृता तांबे नेहा भन्साली अनिल पाचंगे सुशमा शर्मा गौरी राऊत,आलोक खेडेकर, प्रेम सुडके,शिवानी कुलकर्णी, विक्रम वर्पे, रुपाली राजुरे, राजेन्द्र ठोके, रवींद्र बाराथे, विकास वाघमारे,अनिल तायडे,केदार पाटील, मनिषा पाटील,अमृता तांबे, सावी वासनिक,( मॉडेल ) आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी नाशिकचे डॉ. शाम जाधव, डॉ.अशोक पगारे, यांना स्वराज्य शूर वीर जिवाजी महाले समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माझी पीएसआय महेंद्र बर्वे सर, कवी पंढरीनाथ पगारे, इगतपुरी साहित्यिक विचार मंच यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे आयोजन गणेश वाळुंजकर, गिरी राजूरकर, सागर गायकवाड यांनी केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गायकवाड यांनी केले. स्वागत गणेश वाळुंजकर,यांनी केले.
आभार गिरी राजूरकर, यांनी मानले
Comments
Post a Comment