अमृतधाम चौकात अपघातांची मालिका सुरूच, भाजपचे कार्यकर्ते जखमी
नाशिक :- अमृतधाम चौकात छोटे मोठे अपघात नित्याचेच झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्या आधीपासून वारंवार या चौकात अपघात झाले आहे.अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. याठिकाणी वाहतूक सुव्यवस्थित करावी म्हणून पोलीस प्रशासनाला तसेच वाहतूक पोलिसांना अनेक वेळा उपाययोजने बाबत निवेदन देऊन झाले आहे.मात्र इथले अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. अपघातांचे कालचक्र कसे थांबवावे हाच परिसरातील नागरिकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे.आजवर अपघात सर्वसामान्य नागरिकांचे झाले आहे.याबाबत उपाययोजना करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते शामराव पिंपरकर, यांनी वेळोवेळी निवेदन देत याप्रश्नी मागणी केली आहे.मात्र यावेळी शामराव पिंपरकर, यांनाच अपघातात दुखापत झाली आहे.भाजप मध्ये अनेक वर्ष काम केरत आहे. आजही कार्यरत आहे त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्य केले अनेक निवेदन दिले त्या निवेदनांना यश देखील आले.मात्र अमृतधाम चौकाची वाहतूक व्यवस्था सुदृढ करण्यात आम्हाला आज ही यश आलेले नाही. असे पिपंरकर सांगतात.अपघात थांबावे म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदन दिले मात्र यावेळी माझ्या वडिलांचाच अपघात झाला. काल ५ वर्षाच्या नातवाला शाळेतून घरी घेऊन येताना एका ट्रक ने वडीलांच्या दुचाकी ला धडक दिली सुदैवाने नातवाला काहीही इजा झाली नाही. मात्र माझ्या वडिलांच्या पायाला आणि हाताला इजा झाली आहे. अपघात घडून गेल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस देखील हजर होते. मात्र त्यांच्या डोळ्यादेखत ट्रक चालक पळून गेला आणि वाहतूक पोलीस केवळ ते दृश्य बघत बसले. अशी व्यवस्था असेल तर आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा? आज वर कित्येकांचे जीव याठिकाणी गेले आणि कित्येकांना इजा झाली मात्र प्रशासनाला अजून ही जाग येत नसेल तर तिथे बसलेले अधिकारी नक्की हाडा मासाचे माणसं आहेत कि नाही यावरच प्रश्न उपस्थित होतो. इतरांचे अपघात झाले त्यावेळी आम्ही प्रशासनाला जाब विचारला मात्र आज माझ्याच वडीलांचा अपघात झाला तर जाब विचारायला कोण जाणार? आणि वारंवार प्रशासनाला जाब विचारून देखील त्यांचे डोळे उघडत नसतील तर सर्वसामान्य जनतेने शेवटी डोळे मिटून घ्यावेत का? याचे उत्तर वाहतूक पोलीस प्रशासनाने आम्हाला द्यावे.
निवेदन देऊनही न्याय मिळणार नसेल तर आम्ही परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहोत.असा इशाराही प्रसिद्धी प्रमुख न्युज शी बोलतांना अविनाश पिंपरकर यांनी दिला आहे.
अविनाश शामराव पिंपरकर
अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा तपोवन मंडल
Comments
Post a Comment