शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या रंगमंचाचे भूमिपूजन
जनार्दन स्वामी आश्रम वेरूळ प्रवक्ते
भारत माता आश्रम अध्यक्ष,शिवपुत्र संभाजी चे लेखक दिग्दर्शक निर्माते महेंद्र महाडिक,विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर
अरुण पवार म.नगरसेवक, मधुकर हिंगमीरे मा.नगरसेवक, बिरारी सर, सहसचिव, पेठे हायस्कुल, श्री अपूर्व पाटील,योगेश कमोद जनसंपर्क अधिकारी मनपा ,कमलाकर गोडसे,किशोर अहिरराव, यांच्या शुभहस्ते पार पडला.या रंगमंचाची आणि साधुग्राम मैदानाची विधिवत पूजा ज्ञानवर्धिनी प्रसासरक मंडळ आणि तळ्याची वाडीचे संचालक गोपाळ पाटील आणि अंजली पाटील यांनी केली.
३० एप्रिल ते ५ मे दरम्यान होणाऱ्या शिवपुत्र संभाजी महानाटयमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका खासदार डॉ अमोल कोल्हे साकारणार असून मुंबई,पुणे,कोल्हापूर सातारा व नाशिक मधील १५० कलावंत या महानाट्य मध्ये काम करणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हे महानाटय असून कलावंताचा सराव देखील सुरू झाला आहे.४० ट्रक रंगमंचाचे साहित्य तपोवन साधुग्राम येथे पोहोचले असून ७ मजली भव्य रंगमंच आणि ९३०० प्रेक्षकांना आसन व्यवस्था करण्याचे काम भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर सुरू करण्यात आले. हजारो हातांना या महानाट्यामुळे रोजगार उपलब्ध होणार असून या कला पर्वणीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक गोपाळ पाटील,नचिकेत पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment