सेवा हक्क दिनानिमित्त माहिती लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची माहिती
नाशिक - 'आपली सेवा आमचे कर्तव्य' असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवार दि.२८ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.या कायद्यांतर्गत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काला वधीत विविध लोकसेवां साठी एकूण ५५ लाख ४८ हजार ४८५अर्ज प्राप्त झाले. ५१ लाख ३७ हजार ४७४ अर्ज निकाली काढण्यात आले.त्यापैकी ५० लाख ६८ हजार १३३ अर्ज निश्चित केलेल्या कालमर्यादेत निकाली काढण्यात आले. सेवांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या बघता नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे,अशी माहिती लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिली आहे.
नागरिकांना दैनंदिन जीवनात विविध दाखल्यांची आवश्यकता असते.कधी पाल्याच्या शालेय,महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्न, अधिवास,नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयत्व,शेतकरी,विवाह नोंदणी,दिव्यांग दाखला, जन्म मृत्यू नोंद दाखल्यासह विविध दाखल्यांची आवश्यकता असते.त्या साठी नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागत असे.त्यात बराच कालावधी जात असे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी नागरिकांना आवश्यक सेवा ऑनलाइन आणि विहित केलेल्या कालावधीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू केला.याअधिनियमाची अंमलबजावणी २८ एप्रिल २०१५ पासून सुरू झाली. या कायद्यांतर्गत 'आपले सरकार' पोर्टलवर आता पर्यंत ३८ विभागांच्या ९६९ सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत.महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा एक क्रांतिकारी कायदा असून त्यामध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत विविध वैशिष्ट्ये आहेत. लोकसेवा देताना पारदर्शकता, उत्तरदायीत्व,कालबद्धता, कार्यक्षमता या बाबी साध्य करण्याचा प्रयत्न या कायद्यातून झाला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता व पारदर्शकतेच्या संस्कृतीस चालना देण्यावर या कायद्याचा भर राहिला आहे.नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा उंचावणे व त्या विहीत कालावधीत जबाबदारीपूर्वक पुरविल्या जातील याची खात्री करणे या कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे विद्यमान मुख्य आयुक्त आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑन लाइन सेवांची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या Aaplesarkar. mahaonline. gov. in आपले सरकार या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय या संकेत स्थळावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची माहिती, लोकसेवा हक्क कायदा, नियम व त्याची अंमल बजावणी, वार्षिक अहवाल आदी माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळाचा वापर करताना नागरिकांनी प्रथम वापरकर्ता म्हणून स्वतःची नोंदणी करणे आवश्यक
Comments
Post a Comment