संघाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नाशिक :- 14 एप्रिल महामानव,भारत रत्न, बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंकराचार्य न्यास येथे संघ शहर कार्यवाहक विजय मालपठाक, शहरातील संघ स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.तसेच
समरसता गतिविधी नाशिक शहराच्या वतीने पंचवटीतील संयुक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहक्षेत्र प्रचारक चिंतन उपाध्याय,यांचे हस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास, शहरकार्यवाह सुहास वैद्य, शहर प्रचारक सुशांत पांडकर, मंगेश खाडिलकर ऋषिकेश काळे, अशोक शिरोळे, विजय काळुंखे, कुंतक गायधनी, निखिल नवले, धनंजय दप्तर, वृषाली घोलप, तसेच मंडळाचे अध्यक्ष जगन गांगुर्डे, भरत मोहिते,आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सत्याग्रह चौकातील, राजवाडा येथे माहिते यांच्या परिवाराची भेट उपस्थितांनी घेतली. काळाराम मंदिर सत्याग्रह आंदोलनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या घरी निवसास होते.यावेळी उपस्थितांनी मोहिते कुटुंबातील सदस्याशी संवाद साधला.
Comments
Post a Comment