वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना निवेदन,टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी


नाशिक इंदिरानगर :- परिसरातील नागरिकांनी मा.नगरसेवकाच्या नेतृत्वात दिले इंदिरानगर नगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन. नंदीनी नदी ते पाथर्डी प्रभाग क्रमांक 31 मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर व टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. मागील महिन्यात पाथर्डी गावातील प्रगतिशील शेतकरी व वारकरी सांप्रदायिक  बाकेराव  ढेमसे,यांच्यावरच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. मागील 10-15 दिवसापूर्वीही डॉ भागवत सभागृह शेजारील पाण्याच्या टाकीखाली रात्री एक दोन वाजता काही युवक दारू पिऊन धिंगाणा करत होते. माजी नगरसेवक अमोल जाधव, यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना 112 वर कॉल करून बोलवून घेतले सर्वांच्या गाड्या व पकडून त्यांना जमा करण्यात आले तरी हे प्रकार थांबायला तयार नाहीत काल दिनांक १०-४-२५ रोजी रात्री काही टवाळखोर तरुण भागवत समागृहाजवळ उद्यानात अमोल जाधव, यांना सकाळी मॉर्निंग व करताना डॉ  भागवत सभागृहाजवळील उद्यानात दोन-तीन जण झोपलेले आढळले अमोल जाधव यांनी  112 क्रमांकावर पोलिसांना फोन करून बोलावून घेतले पोलिसांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करताच दोन जण पळून गेले. एक भुऱ्या नावाच्या तरुणाला  पकडण्यात आले दिवसा दुपारी एक ते तीन या वेळेत व रात्री असेच काही तरुण नशा करत डॉ. भागवत सभागृहाच्या उद्यानात  तसेच श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात टवाळखोरी करीत महिलांना नागरिकांना त्रासदायक असलेल्या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा. युवा गुन्हेगार व सोनसाखळी चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा तसेच प्रभागात चौका चौकात  ठिकाणी पोलीसग्रस्त वाढवावी अन्यथा चेतना नगर विकास मंडळ व दीर्घायुष ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक  अमोल जाधव, चेतना नगर मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप, अरविंद अत्तरदे, अजय पाटील, विष्णू उगले,सुभाष पाटील, गोपीनाथ बच्छाव, यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिले.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला