रेडक्रॉस मविप्र आणि नाशिक सायकलिस्टस द्वारा आरोग्यदिन जल्लोषपूर्ण उपक्रमांनी संपन्न


इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा , मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित वर्ल्ड हेल्थ डे सायक्लोथॉन प्रसंगी विविध मान्यवरांसमवेत सायकलस्वार
नाशिक :- इंडियन रेड क्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखा , मविप्र चे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त वर्ल्ड हेल्थ डे सायक्लोथॉनसह सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित सायकल रॅलीमध्ये १५०हून अधिक सायकलिस्ट उत्स्फूर्तपणे सहभागी झाले . सुरुवातीला वननेस डान्स स्टुडिओचे डॉ.अजय भन्साळी यांनी संगीताच्या तालावर सर्वांचे वॉर्मअप सेशन घेतले . प्रत्यक्ष रॅलीला आरंभ मॅरेथॉन चौक येथून मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी हिरवा झेंडा दाखवून केला . " शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . स्वतःच्या व परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणे , स्वच्छता राखणे आणि पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवणे या त्रिसूत्रीमध्ये देशाला विकसित बनवण्याचे सामर्थ्य आहे.

" असे प्रतिपादन अॅड. ठाकरे यांनी यावेळी केले . यावेळी रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी , मविप्र मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे , रेडक्रॉस सचिव डॉ. सुनील औंधकर , मेजर पी. एम. भगत, समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर , सायकलिस्ट्स अध्यक्ष किशोर काळे, कार्यक्रम संयोजक डॉ. मनिषा रौंदळ, प्रतिभा भगत , मोहन देसाई उपस्थित होते. "सायकल चालवा आरोग्य टिकवा", "माझे आरोग्य माझा हक्क", "आरोग्यदायी आरंभ - आशादायी भविष्य " अशा जनजागृतीपर घोषणा देत उत्साहपूर्ण परंतु अतिशय शिस्तबद्ध वातावरणात सायकल रॅलीची मार्गस्थ झाली. पंडित कॉलनी - सिव्हिल हॉस्पिटल - मुंबई नाका - इंदिरानगर - वडाळा नाका - शालिमार मार्गे रेड क्रॉस भवन येथे रॅलीची सांगता झाली . यानंतर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भरत पाटील यांनी "आरोग्य आणि फिटनेस " विषयावर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले . यानंतर मविप्र इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन च्या चमूने "आरोग्यदायी आरंभ - आशादायी भविष्य " या आरोग्य संघटनेने दिलेल्या संकल्पनेवर आधारित सादर केलेल्या पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले . याचवेळी आरोग्याविषयी जनजागृतीपर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. अनेक सायकलिस्टनी यामध्ये सहभाग नोंदवला . जनजागृती पोस्टर्स व संदेशांनी सायकली सजविल्या होत्या . मेघा सोनजे , प्रवीण खोडे , मेश्राली थोरात , डॉ. मनीषा रौंदळ यांच्या पोस्टर्सना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण डॉ. अजय पाटील व डॉ. शीतल सुरजुसे यांनी केले. रॅली यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व सायकलिस्टना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले., आदी मान्यवर उपस्थित होते. रेड क्रॉस येथे मविप्र रक्तपेढीच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. अॅड. नितीन ठाकरे यांच्या सुविद्य पत्नी वंदनाताई ठाकरे आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान शिबिरास प्रारंभ केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी नितीन गायकवाड , चंद्रकांत गोसावी, जयश्री कुलथे, मंगला कस्तुरे , मनोज निकम प्रयत्नशील होते.
( क्षणचित्रे : 

डॉ. अजय भन्साळींनी घेतलेल्या अभिनव वॉर्म अप ने सहभागी सर्व सायक्लिस्टस मध्ये जोश निर्माण केला .

शहरातील विविध भागातून दहा हून अधिक किमी अंतर पार करूनही शिस्तबद्ध व वाहतुकीला अडथळा येऊ न देता आरोग्यजागृतीपर घोषणा देत जाणारे सायकलस्वार सर्वांच्या कुतूहलाचा विषय झाले .

आपल्या बाबागाडीला आरोग्य फलक लावून पालकांसह सहभागी झालेले मेश्राली मिताली विक्रांत थोरात हे फक्त पाच महिन्याचे बाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . 

पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि वंदनाताई नितीन ठाकरे यांनी सुरुवातीलाच उत्स्फूतपणे रक्तदान करून नवीन पिढीसमोर नवा वस्तुपाठ ठेवला .

मविप्र च्या नर्सिंग विद्यार्थ्यांनी यंदाच्या संकल्पनेवर सादर केलेले पथनाट्य प्रेक्षकांना भावले . )


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला