शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव



नाशिक :- दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ व व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक या संघटनेतर्फे दिनांक 29 एप्रिल हा दिवस कला रविवर्मा यांचा जन्मदिन म्हणून 7 वर्षापासून साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने जिल्ह्यातील बाळ नगरकर (नाशिक) पुंजाराम सावंत नामपूर (सटाणा) व शुभदा विद्यालय सोयगाव मालेगावचे कलाशिक्षिका सुवर्णा पगार, यांना प्रख्यात चित्रकार रवी वर्मा, यांच्या नावाने पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, व महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद साळुंखे, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यासोबत, राज्य सदस्य दत्तात्रय सांगळे सर, व्हिजन विभागीय अध्यक्ष NDST चे संचालक चंद्रशेखर सावंत सर व्हिजन नाशिकचे जिल्हाध्यक्ष,NDST सोसायचीचे संचालक,जुनी पेन्शन चे राज्य कार्याध्यक्ष सचिन पगार, महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोखंडे, नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय बोरसे, मिलिंद टिळे, रमेश तुंगार,मालेगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत वाघ, योगेश रोकडे, सागर बच्छाव, सागर पवार, बिडगर सर, गवळी सर, सूर्यवंशी सर अनेक कलाशिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने के.बी.एच. ट्रस्ट चे संस्थेचे अध्यक्ष प्रसाद हिरे, महिला बँकेचे चेअरमन श्रीमती इंदीराताई हिरे, शुभदा शाळेचे मुख्याध्यापक सैंदाने सर,व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला