ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
नाशिक :- ग्राहक रक्षक समितीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन डॉ. सौ. आशाताई पाटील (राष्ट्रीय अध्यक्षा) यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात रविवार, दि.६ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाले. हे नवीन कार्यालय दुकान क्र. ३, खालचा तळमजला, राधावल्लभ संकुल सोसायटी, पांडे मिठाई जवळ, रथचक्र चौक, इंदिरानगर, नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे.
या विशेष प्रसंगी समितीचे राष्ट्रीय स्तरावरील अनेक पदाधिकारी,समाजसेवक उद्योगपतींची उपस्थिती लाभली. यामध्ये राष्ट्रीय कमिटी सदस्य हर्षद गायधनी, योगेश मालुंजकर, किशोर ओसवाल, जुबेर शेख, बापू वाळुंज, अनिल काटे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतीताई केदारे, dr. जानकी नायक, प्रदेशाध्यक्ष संजना गायकवाड, जिल्हाध्यक्ष कांचनताई जाधव, उपाध्यक्ष आरती शेळके, मार्गदर्शक सुनील पाटोळे, तसेच सुनिता गांगुर्डे, सुरेखा घोलप, स्वाती येवले, पारुल महांदू, प्राची मॅडम,धनश्री गायधनी, समाजसेवक संजय देशमुख, मेघा शिंपी, जयश्री चौधरी, उद्योजक जयेश ठक्कर, राधा सिंग, मृणाल सूर्यवंशी, बिझनेस ओनर कैलास खिमाने, गौरी छाया चौधरी, योगेश मरसाले, अमोल भागवत,आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला ग्राहक वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राहक रक्षक समितीच्या वतिने आशाताई पाटील व ज्योती केदारे यांच्या हस्ते पवार प्रविण यांची ग्राहक रक्षक समितीच्या नियुक्ती पत्रक देऊन सिन्नर तालुका, अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
Comments
Post a Comment