भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने अभिवादन
नाशिक – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शिवाजी रोड येथील मुख्य पुतळ्यास महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, राजीव गांधी मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंते जितेंद्र पाटोळे व राजेंद्र शिंदे, सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या, शिक्षणाच्या आणि न्यायाच्या विचारांची आठवण करून देत त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केली.
महापालिकेच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.या वेळी देवांश तायडे या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनातील महत्वाच्या घटना घडामोडी इंग्रजी भाषेतून सविस्तर पणे मांडून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले,उपायुक्त सताळकर यांच्या हस्ते देवांश तायडे याचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment