निफाड लाचखोरी प्रकरणी संपत्ती जप्त करण्याची छत्रपती सेनेची मागणी
नाशिक :- निफाड भूमी अभिलेख लाच प्रकरणातील मुख्य सुत्रधार भूमि अभिलेख अधिकारी भाबड यांच्यासह शिपाई यांना निलंबित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी
छत्रपती युवा सेना संघटनेची मागणी
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
निफाड भूमिअभिलेख कार्यालयात शिपाई मार्फत लाच मागणाऱ्या मुख्यसूत्रधार उपधिक्षक भाबड, यांना त्वरित निलंबित करण्याची कार्यवाही करावी तसेच शिपाई नितेंद्र गाडे, व उपधिक्षक भाबड यांची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी. अशी मागणी आज छत्रपती युवा सेनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली भुमी अभिलेख अधिकारी भाबड यांच्यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल याची असा इशाराही छत्रपती युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी छत्रपती युवा सेना प्रदेश सरचिटणीस निकेश पाटिल, प्रदेश प्रवक्ते यश बच्छाव, नाशिक जिल्हाध्यक्ष किशोर वडजे, महानगर प्रमुख मंगेश कापसे,शिक्षक आघाडी प्रमुख राहुल पगारे, यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment