वैजापूर नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा
वैजापूर :- दिनांक. ११/३/२०२५ रोजी छत्रपती शिवाजी मंगल कार्यलय नगरपरिषद वैजापूर येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात वैजापूर नगरपरिसद सी.ओ. सौं संगीता नांदूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी वैजापूर जाॅईंट ग्रुप च्या अध्यक्ष सौं अंजलीताई जोशी.तसेच शिवसेना च्या तालुका प्रमुख निशाताई गोरक्ष. बचत गटांच्या सुनीताताई साखरे, न्यूज चॅनल च्या ज्योतीताई हंगे, तसेच डॉ प्रतिमा सोनवणे,यांनी सर्वानी क्रांतिजोत सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दीपप्रजोलित करून कार्यक्रमास सुरुवात केली. वैजापूर नगरपरिषद अंतर्गत सर्व बचत गटाचे स्टाॅल, पाककला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सी ओ. संगीता नांदूरकर, यांनी आपल्या भाषणात सांगितले की अनेक महिलांना विविध क्षेत्रात कार्य करत असतांना योग्य ती मदत करेल. आपल्या जीवनातील काही आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येतात जातात पण खंबीर होऊन महिलांनी पुढे जायला हवे. आपली प्रगती करायला हवी मुलींना शिक्षण द्यावे,आपला परिसर व आपले शहर हे स्वच्छ ठेवायला हवे, आपले मनोगतात महिलांचा आत्मविस्वास वाढवला.निशा गोरक्ष यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जोशीताई यांनी ही महिलांना अनेक विषयावर मार्गदर्शन करत माहिती दिली. ज्योती हंगे यांनी दुखावर व संकटावरमात करू पुढे जायला हवे जीवन हे खूप सुंदर आहेत. महिलांचे मनोबल वाढेल असे आपले मनोगत व्यक्त केले डॉ सोनवणे ताई यांनी महिलांनी आपली काळजी व आपले शरीर कसे निरोगी ठेवावे याची माहिती दिली. साखरे ताई यांनी बचत गटापासून महिलांना मिळणारे फायदे व बचत गटाची माहिती सांगितली.
यानंतर बचतगटांनी आयोजन केलेल्या पाककलाची सी ओ नांदूरकर मॅडम यांनी पाहणी केली.यावेळी सुंदर असे पाककला स्टाल लावण्यात आले. जगतिक माहिला दिन कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौं आंबेकरताई आहेर ताई यांनी केले सर्व बचतगट स्टाॅल आयोजन सूर्यकांता काकडे बचत गट आयोजक यांनी केले तसेच सहायक श्री शेटे सर,प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत, दिवाकर सर, त्रिभुवन सर,
महिला अध्यक्ष चित्रा थोरात, सॊनवणे ताई व सर्व सी आर पी व सदस्य बंधू भगीनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्तित होत्या.
Comments
Post a Comment