राधिका फाउंडेशनकडून ५१ महिलांचा ‘वीरनारी सन्मान सोहळा संपन्न
राधिका फाउंडेशनकडून ५१ महिलांचा ‘वीरनारी सन्मान’ सन्मान सोहळा सन्मानित संपन्न
नाशिक :- दि.२३/३/२०२५ रोजी वीर माता सन्मान सोहळा पंडित कॉलनी संपन्न राधिका फाउंडेशन, च्या वतीने महिला दिन व शहीद दिनाचे औचित्त्य साधत ५१ वीरमाता व वीरपत्नी वीरनारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम २३ मार्च २०२५ रोजी, लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी नाशिक येथे पार पडला. कार्यक्रमासाठी कविता पाळदे, लहवित, संजय देशमुख साईधन वर्षा फाऊंडेशन अध्यक्ष, अरविंद सोनवणे, राधिका फाऊंडेशन बागलाण अध्यक्ष, हर्षाली भोसले, अभिनेत्री राधिका फाऊंडेशन ब्रँड अँबेसिडर, लोकसाक्ष न्युज चे मुख्य संपादक सुरेश चव्हाण, हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. संस्थापिका डॉ. चेतना सेवक, अध्यक्षस्थानी होत्या. सूत्रसंचालन पुनम भांबरे, व सुरेश चव्हाण यांनी केले. अंकिता कुलकर्णी यांनी
गणेश वंदना सादर करत कार्यक्रमा ची सुरवात केली.
प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या योगदानाचा गौरव करताना, महिलांनी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा असा संदेश दिला. डॉ.चेतना सेवक, यांनी महिला दिन वर्षभर साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच शहीद परिवारा ला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आव्हान केले.याप्रसंगी पुरस्कारार्थी महिलांनी राधिका फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाला चंदू काका सराफ व लोकमान्य मल्टीपर्पज बँकेचे सहकार्य लाभले. राधिका फाउंडेशनचे विकी कुटे, रेखा काळे, कल्पना पवार, शैला ठाकर, उज्वला चौधरी, शीतल काकूळते यांच्यासह महिलांनी कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पाडला. यावेळी आलेल्या वीरपत्नी, वीरमाता या अतिशय भावुक झाल्या होत्या आणि मनमोकळेपणाने त्यांनी आपली मनोगत व्यक्त करत त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी बोलून दाखवल्या. डॉक्टर चेतना यांनी खूप सुंदर असं व्यासपीठ आम्हाला निर्माण करून दिल, आमचा गौरव सन्मान केला अशा देखील भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी सर्व मान्यवर, सर्व सन्मानार्थि, राधिका फाउंडेशनचे सहकारी यांचा येथायोग्य सन्मान करण्यात आला. अतिशय आगळा वेगळा आणि स्तुत्यप्रिय असा उपक्रम राधिका फाउंडेशन आणि लोकसाक्ष न्यूज यांनी यावेळी राबवला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला आणि महिलांनी अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.
Comments
Post a Comment