सचिन पाडेकर यांना दिल्ली येथे भारत गौरवरत्न हा मानाचा पुरस्कार



नाशिक - अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे देणगीदार व अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करणारे डॉ. सचिन पाडेकर यांना दिल्ली येथे भारत गौरवरत्न हा मानाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी सिने अभिनेत्री रविना टंडन, जगदीश मुखी,किरण सेठी व इतर मान्यवर उपस्थित होते.डॉ. सचिन पाडेकर यांना मिळालेल्या भारत गौरवरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे शिवसेना लोकसभा संघटक तथा ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष भगवंत पाठक, ब्राह्मण शहर संपर्कप्रमुख अंबादास जोशी, नाशिकरोड ब्राह्मण महासंघ अध्यक्ष संग्राम फडके, ब्राम्हण महासंघ महिला कार्याध्यक्षा सोनाली कुलकर्णी, तसेच अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे पदाधिकारी व ब्राम्हण महासंघ पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवांनी अभिनंदन केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी