आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अँड अमित दोंदे यांची निवड
इंदिरानगर - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त पाथर्डी फाटा येथील डॉ.आंबेडकर पुतळा येथे यंग सम्राट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप दोंदे व विशाल दोंदे यांच्या अध्यक्षते खाली मीटिंग होऊन सर्वानुमते जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी अँड अमित दोंदे यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी दिनकर साळवे यांची निवड करण्यातआली असून विविध समितींच्या पदावर अनिल गायकवाड,नितीन कोळी,सुनील यशवंत, नितीन इंगले,मिलिंद गायकवाड,यासिन शेख, शामराव लोखंडे,कुंदन रोकडे,बाळासाहेब साळवे, शिवा चक्रधारी आदींची निवड करण्यात आली.

Comments
Post a Comment