मविप्र निवृत्त सेवक संघाच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे माजी अध्यक्ष व माजी सरचिटणीस कर्मवीर ॲड. बाबुरावजी गणपतराव ठाकरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी बुधवार दि. १२ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय व संशोधन केंद्र, आडगाव, नाशिक येथे संपूर्ण दिवसभर नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघातील सभासदांची मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे.
मातृसंस्थेच्या सहकार्याने निवृत्त सेवक संघातील सभासदांच्या (पती-पत्नी) एकूण १० प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. सभासदांनी या शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अॅड. यु.आर. जाधव, उपाध्यक्ष एस. आर. पगार, सचिव माणिकराव गोडसे व सहसचिव एल. एस. तिडके आणि सर्व संचालकांनी केले आहे.
Comments
Post a Comment