गटविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
सुरगाणा :- तक्रारदार पुरूष वय- 44 वर्ष यांनी या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे गटविकास अधिकारी सुरगाणा यांच्या लाच मागणी प्रकरणी तक्रार केली आहे.सदरच्या तक्रारी वरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.सदरच्या घटनेत
आरोपीत महेश गोकुळ पोतदार, गट विकास अधिकारी गट- अ (वर्ग 1) , पंचायत समिती, सुरगाणा.यांनी लाचेची मागणी
दिनांक 25/03/25 रोजी केली.
2 ,10,000/- रुपये लाच -
दिनांक 25/03/25 रोजी स्वीकारली
याबाबत बातमी अशी आहे की तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजने मध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून आलोसे महेश गोकुळ पोतदार, गटविकास अधिकारी गट- अ (वर्ग 1) , पंचायत समिती, सुरगाणा. यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मध्ये यांचे थकीत सुमारे 2 कोटी 32 लाख 30 हजार 27 रुपयेचे बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांचेकडे 2 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली होती त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता आलोसे यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 2,10,000/- रुपयाची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून 2,10,000 रुपये पंचांसमक्ष स्विकारले म्हणून सुरगाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.सदरची कारवाई शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी राजेंद्र सानप,पोलीस निरीक्षक लाप्रवि .नाशिक सापळा कार्यवाही पथक पो ना/किरण धुळे, पो ना विलास निकम, चालक पो. हवा. संतोष गांगुर्डे.यांनी केली.
Comments
Post a Comment