हिरकणी हास्य क्लबच्या वतीने इंदिरानगरला दिव्यांग पाल्यांच्या मातांचा सत्कार
राजीवनगर येथे दिव्यांग पाल्यांचा सांभाळ करणाऱ्या मातांना आमंत्रित करून आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत हा मानसिक आधार देण्याच्या हेतूने सत्कार करण्यात आला.
उपस्थित प्रत्येक पालकाची
मुलाखत घेऊन त्यांना बोलतं करत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.अतिशय रोमांचकारी असा बोलका अनुभव या सत्काराच्या निमित्ताने अनुभवला. सर्व मातांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.याच वेळी हिरकणी हास्यरत्न २०२५ '' हा पुरस्कार क्लबच्या सदस्या वासंती कुलकर्णी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. क्लबच्या अध्यक्षा सविता एरंडे यांना आजी आजोबा फाउंडेशन तर्फे नारी शक्ती सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल क्लबच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.
क्लबच्या लीला कुटे,स्मिता जोशी,अरुणा सोनवणे, सुनिता बच्छाव,सुषमा बोटके यांचाही सत्कार करण्यात आला.
दररोज व्यायाम व हास्य प्रकार घेणाऱ्या कोहली, अरुणा श्रावगी, चित्रा जोशी, सिंधू सोनारे, लीला कुटे, यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा सोनवणे, व आभार प्रदर्शन चित्रा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment