गुढीपाडवा मराठी नववर्षानिमित्त स्वागत यात्रा
इंदिरानगर :- जय श्री रामाचा जय जय कार करत शंख नादावर वय वर्ष पाच ते 85 पर्यंतच्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत महिला पुरुष याचे सह राम,लक्ष्मण,सीता, हनुमान आदी देवदेवतांची वेशभूषा केलेले बालगोपाळ लक्षवेधी ठरले तर नऊवारी साडी परिधान केलेल्या हातात भगवा ध्वज घेऊन वय वर्षे 5 च्या बालगोपाळांनी चित्त थरारक गोल रिंगण करून स्केटिंगची प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेत ठीक ठिकाणी यात्रेचे स्वागत केल्याने नव वर्षाचा उत्साह सर्वत्र संचारला होता.नासर्डी ते पाथर्डी परिसरात मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात आल्या होत्या इंदिरानगर परिसरात हिंदू नववर्षाच्या ११ स्वागत यात्राचा समारोप एस आर चौकात एकमेकांना नववर्षांच्या शुभेच्छा देऊन करण्यात आला.
वर्ष प्रतिपदा गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे इंदिरानगर मध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रा जल्लोषात काढण्यात आल्या.११ ठिकाणाहून निघालेल्या स्वागतयात्रेत अबाल वृद्धांचा पारंपारिक वेशभूषेत सहभाग, ठिकठिकाणी रांगोळ्या,नववर्षाच्या जनजागृती अभियान हे या यात्रेचे आकर्षण ठरले.
हिंदू संस्कृती संवर्धनाच्या या कार्याची सुरवात २१ वर्षा पुर्वी इंदिरानगर मध्ये झाली,यंदाचे २२ व वर्ष असून काठेगल्ली,अशोका मार्ग,इंदिरानगर, राजीव नगर,कलानगर, वन वैभव कॉलनी, चेतना नगर या ठिकाणी स्वागत यात्रांना प्रारंभ सकाळी प्रारंभ झाला. या मध्ये परिसरातील सामाजिक व धार्मिक संस्था, हास्य क्लब ज्येष्ठ नागरिक संघ,मंदिरे, गणेशोत्सव मंडळे,भजनी मंडळ, तसेच नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. या स्वागत यात्रां काठे गल्ली येथील श्री मारुती मंदिर येथून यात्रा प्रमुखशशिकांत खोत,रविशंकर मार्ग अशोका मार्ग अरण्येश्वर महादेव मंदिर यात्रा प्रमुख विवेक येलमामे व शैलेंद्र जोशी,विनय नगर कौशल्येश्वर महादेव मंदिर यात्रा प्रमुख चारुदत्त वैद्य, इंदिरानगर श्रीराम उद्यान यात्रा प्रमुख सतीश सैंदाणे, गजानन महाराज मंदिर इंदिरानगर यात्रा प्रमुख सुरेश बोडके, बजरंग सोसायटी हनुमान मंदिर यात्रा प्रमुख अरुण मूनशेट्टीवार,दास मारुती मंदिर, चेतना नगर यात्रा प्रमुख रविंद्र पाटील, रिद्धीसिद्धी मंदिर यात्रा प्रमुख श्रीकांत जोशी,श्रद्धा विहार कॉलनी यात्रा प्रमुख किरण चौधरी,साई मंदिर, गुरु गोविंद सिंह कॉलेज समोर सुनील जोशी, साक्षात्कारी दत्त मंदिर, राजीव नगर.हेमंत हरण, इंदिरानगर येथील शिखर स्वराज स्केटिंग क्लबच्या अनुजा चव्हाण, यांचे सह क्लबचे बालगोपाळ आदीच्या उपस्थितीत जय श्री रामाचा जय जयकार करत मोठ्या उत्साहात निघाल्या. तसेच संध्याकाळी पेठे नगर येथे जल्लोष नववर्षाचा कला क्रीडा संस्कृतीचा या मध्ये खाद्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम,छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित नाट्य तसेच प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, उपस्थितांना त्यांच्या भाषेत संबोधित करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त शहरातील डॉ राजेश शाहीर,पल्लवी पटवर्धन, किरण भालेराव, अपर्णा क्षेमकल्याणी,आणि सई, अदिती,तुषार या कलावंतांना कलाभूषण पुरस्कार धनंजय वाबळे, यांना कुलगुरू पुरस्कारासह विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत नववर्ष स्वागत बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष विराज लोमटे,यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष सोनाली कुलकर्णी, यांनी केले,आभार सचिव शरद गीते, यांनी मानले. यात्रा यशस्वी ते साठी नागरिकांसह स्वागत यात्रा प्रमुख व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment