ग्राहक रक्षक समितीच्या वतीने पत्रकार महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित
ग्राहक रक्षक समितीच्या वतीने पत्रकार महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित
नाशिक :- { प्रतिनिधी डॉ. शाम जाधव }कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता पत्रकार समाजाचा आरसा म्हणून काम करतात. गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकार बांधवांचे मोठे योगदान असून त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजाची सेवा घडत असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले.नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान,विद्या विकास सर्कल येथे ग्राहक रक्षक समितीच्या वतीने आयोजित 'महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार २०२५ सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महेंद्र चव्हाण बोलत होते. सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील २४ पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्षा डॉ. आशाताई पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, नरेडको नाशिक संस्थापक सदस्य व मार्गदर्शक जयेश वलभदास ठक्कर, संस्थापक अध्यक्ष शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संगीता गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योती प्रकाश केदारे शिंदे, मिस इंडिया इंटरनॅशनल जीन दुबई डॉ. ताराणू अजिज शेख अरविंद सोनवणे,आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय संपर्कप्रमुख ग्राहक रक्षक समितीचे राष्ट्रीत संपर्क प्रमुख कुणाल राजे भोसले, ग्राहक रक्षक समितीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. जानकी पराग नाईक, यांनी केले होते. अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पत्रकारांचे कौतुक केले. हा पुरस्कार सोहळा नाशिकच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, भविष्यातही असे उपक्रम राबवण्याची ग्वाही आयोजकांनी दिली.
सन्मानित पत्रकारांची नावे खालीलप्रमाणे आहेतः
श्री समाधान रमेश शिरसाठ ( संपादक साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख)
राजेंद्र सुरेंद्र सूर्यवंशी
लक्ष्मण बवन सोनवणे (दैनिक प्रहार लोकनामा)
संदीप विनायक काकड (लोकसेवा मराठी न्यूज) तुकाराम मधुकर रोकडे (दैनिक लोकमत, त्र्यंबकेचर) रामचंद्र अर्जुन ताठे (दक्ष न्यूज) गायत्री योगेश लचके (रोखठोक रणरागिनी न्यूज) विजय चुनीलाल बागुल (दक्ष टीव्ही रिपोर्टर) रामभाऊ विठ्ठलराव आचारे (निफाड़ प्रतिनिधी, दैनिक
महाभारत, दैनिक लोक परिवर्तन, दैनिक
विदर्भसत्यजित, दैनिक सांय, दैनिक साई संध्या)
दीपक देवानंद बागुल (रिपोर्टर, जी नाईन महाराष्ट्र)
डॉ. शाम जाधव (उपेक्षित नायक, प्रकाश पर्व, शिवगर्जना न्यूज)
पल्लवी शेटे (दैनिक देशदूत, स्टार न्यूज रिपोर्टर)
अंजली राऊत (दैनिक पुढारी, उपसंपादक)
मुकुंद बबनराव आव्हाड (नाशिक स्टार न्यूज)
ज्ञानेश्वर शेषराव सुराशे (संचालक, संपादक, पक्षप्रमुख
मनीष कांतीलाल मुथा ( निर्भीड पोलीस टाईम न्युज नाशिक रोड)
प्रा. डॉ.अशोक बन्सी पगारे (निर्भीड पत्रकार फाउंडेशन, प्रकाश पर्व )
प्रवीण पवार ( महाराष्ट्र २४ तास न्यूज रिपोर्टर
वृत्तपत्र)
संतोष लचके (नाशिक लोकशाही)
वैष्णव घोलप (त्र्यंबकेश्वर)
आशाताई मोरे (पत्रकार)
कृतिका संदीप मराठे (कलाकुंज २४ तास)
विजय कमल धनराज काकडे (सक्षम पोलीस टाइम्स)
नाशिक रोड)
समाधान शिरसाट (पत्रकार)
योगेश घोलप (निर्भीड पत्रकार फाउंडेशन अध्यक्ष)
Comments
Post a Comment