ललित रुंगटा ग्रुपच्या संचालिका माया रुंगटा यांना 'इन्स्पायरिंग वूमन २०२५ पुरस्कार
नाशिक :- ललित रुंगटा ग्रुपच्या संचालिका माया रुंगटा यांना 'इन्स्पायरिंग वूमन २०२५' या प्रतिष्ठित पुरस्काराने मुंबई येथील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये अमृता देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.दूरदृष्टी आणि उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदाना बद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.इंटिरिअर डिझायनर यशस्वी उद्योजिका आणि ललित रुंगटा ग्रुपच्या अभूतपूर्व यशामागील प्रेरक शक्ती म्हणून माया रुंगटा यांनी नावीन्य,सर्जनशीलता चिकाटीचा उत्कृष्ट नमुना सादर केला.त्यांच्या नेतृत्वा खाली ललित रुंगटा ग्रुपने नाशिकच्या 'रिअल इस्टेट' मध्ये मोठी क्रांती घडवली आहे.
Comments
Post a Comment