By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
इंदिरानगर - पाथर्डीफाटा येथील समर्थ नगरातील रहिवाशी लक्ष्मण भाऊराव उगले (82)याचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्याचे पाशात तीन मुले,सुना,एक मुलगी, जावई,नातवंड असा परिवारआहे.
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ लवकरच रास्तभाव दुकानदारांना कमिशन वाढवून देणार मुंबई, दि. २१ - राज्यात २०१७ नंतर रास्त भाव दुकानदारांचे कमिशन वाढवले नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा विभगाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रास्त भाव दुकानदारांना फक्त कमिशनवर अवलंबून राहून दुकान चालवणे कठीण होत आहे हे लक्षात घेता काही दिवसांपूर्वी रास्त भाव दुकानात स्टेशनरी आणि भाजीपाला विकण्यास आम्ही परवानगी दिली आहे. राज्यातील ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होईल. सध्या रास्त भाव दुकानदारांना क्विंटल मागे १५० रुपये क...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
धारणगाव श्री दत्त देवस्थानास ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धारणगाव,दि.१२ फेब्रुवारी :- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धारणगाव येथील श्री.दत्त देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच या देवस्थानाला ब वर्ग धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. श्री.दत्त देवस्थान धारणगाव येथे सभामंडपाचा अनावरण सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दत्त देवस्थानचे मठाधिपती महंत महेशगिरी महाराज, माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, जयदत्त होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच बाळासाहेब पुंड, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, अनिल सोनवणे, पांडुरंग राऊत, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, अशोक नागरे, संजय गायकवाड, अशोक जाधव, प्रकाश घोटेकर, राजूभाऊ गंभिरे, योगेश साबळे, रामभाऊ जगताप, जगन काकडे, शिवनाथ...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
नाशिक ना.रोड :- रेल्वे स्टेशन नासिक रोड येथील टि.सी. यांचे सरकारी कामात अडथळ निर्माण करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीस रेल्वे पोलीस नाशिक रोड येथील पोलीसांना आले यश फिर्यादी नामे नंदकिशोर रमेश शिंदे वय 36 वर्श धंदा नौकरी ( रेल्वेत टि.सी. ) रा. ऋतुराज अपार्टमेन्ट रूम नं. 07 शनि मंदीर जेल रोड नाशिकरोड हे दि. 25.06.2025 रोजी सकाळी 05.25 वा.च्या सुमारास एक अनोळखी प्रवासी त्याचे वर्णन वय अं. 40 ते 45 वर्ष उंची 5 फुट 5 इंच रंगाने गहुवर्ण, अंगाने मजबुत, कपडे अंगात सफेद रंगाचा फुल बाहीचा शर्ट, नेसणीस काळया रंगाची फुल पॅन्ट अश्या वर्णनाच्या इसमाने फिर्यादी हे प्लॅटफाॅर्म नं. 1 वरील आ.एम.एस. ऑफिस जवळ डयुटी करत असतांना नमुद वर्णनाच्या इसमा हा पळु लागल्याने त्यास फिर्यादी यांनी तिकीट विचारले असता त्यास राग आल्याने फिर्यादी यांचे सोबत शाब्दिक वाद विवाद करून त्यांचे डयुटीत अडथळा निर्माण करून शर्टच्या वरिल खिश्यातुन काहीतरी वस्तु काढुन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारून दुखापत करून पळुन गेला त्याबाबत फिर्यादी यांना दुखापत झाल्याने व सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने फिर्यादी...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण मुंबई, दि. २८:- राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. जानेवारी , फेब्रुवारी व मार्च असे ३ महिन्याचे अनुदान आहे. गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रती दिन प्रती गाय रु. ५०/- अनुदान योजनेर्गत राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार ५६९ गायींसाठी पहिल्या टप्प्यात २५ कोटी ४५ लाख ६० हजार ५०० रुपये इतके अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत लाभार्थी गोशाळांना वितरीत करण्यात आले. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य गोसेवा आय़ोगाचे अभिनंदन केले. देशी गोवंश संवर्धन ही काळाची गरज असून, देशी गोवंशाचे संवर्धनामुळे ग्रामीण विकासाचे गतिमान होण्यास मदत होणार आहे. राज्यातील अधिकाधीक गोशाळांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य, अधिकारी व ...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
मुंबई, दि. २७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी व कृषिमंत्री शिवराजसिंह यांची भेट शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे ठोस मागणी नवी दिल्ली 7 :- महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. देशातील एकूण कांदा उत्पादनात 55% वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना मे 2025 मधील अनियमित पावसामुळे जबरदस्त फटका बसला आहे. कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसुल करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे आणि पणन मंत्री रावल यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी सहकारी वि...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
सिन्नर :-दि.२ फेब्रु२५ - मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटया जागीच मृत झाला वनविभागाच्या अधिकारी कांगणे मॅडम यांना घटनेची माहिती देताच अर्धातासात गस्ती वाहन घटनास्थळी दाखल झाले आहे.त्या बिबट्यास डोक्यास मार लागल्या मुळे जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.सदरच्या बिबट्यास मोहदरी वन उद्यान सिन्नर येथे नेण्यात आले आहे.
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
त्रंबकेश्वर :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन श्री मनोज जी मोदी यांनी त्र्यंबक राज्याच्या सुवर्ण मुकुटासाठी सव्वा किलो सुवर्णदान केले मागील महिन्यात श्री मनोज मोदी हे त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते तब्बल 200 वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता. देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून साड़ेआठ किलो चा सुवर्ण मुकुट बनावन्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता . सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थान कडे जमा झालेले आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दlन करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना 125 तोळे दान करू शकतात असे सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले. त्याप्रसंगी त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल , स्वप्निल शेलार व प्रदीप तुंगार,उपस्थ...
By
साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - WEEKLY PRASIDHI PRAMUKH
-
नाशिक दाढेगांव :- येथील वालदेवी नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न युवकाच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या युवकाचे प्राण वाचले,मात्र दुचाकी वाहून गेली. दाढेगांव येथील रोशन वसंत गवळी रविवारी (दि.१८) संध्याकाळी ६ ते ७ च्या सुमारास आपल्या बुलेट दुचाकीवरून पाथर्डी मार्गे नदीपलीकडील दाढेगांव येथे त्यांच्या घरी जात होते. पुलावरील पाण्यातून जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने मोटारसायकलवरील त्यांचे नियंत्रण सुटून मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली. यावेळी हातातील दुचाकी सोडून देत त्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला, काळजाचा ठोका चुकविणारे हे दृश्य पाहत असलेल्या काही तरुणांनी मोठ्या हिमतीने या युवकापर्यत जाऊन त्यास घरी आणले . दरम्यान, वालदेवी धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने वालदेवी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढतच असून, दाढेगांव ग्रामस्थांच्या वतीने वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. सदरील युवकाची बुलेट द...
Comments
Post a Comment