कलेमुळे मानवी जीवनात आनंद - ॲड. नितीन ठाकरे


मविप्रच्या ललित कला उत्सवाचे उद्घाटन
नाशिक : संगीत, नाट्य, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला या कलांमध्ये माणसाच्या मनामध्ये आनंद निर्माण करण्याची ताकद असते. चांगली प्रतिकृती पाहण्याचा आनंददेखील वेगळाच असतो. अशा ललित कला महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पुरस्कारप्राप्त अप्रतिम प्रतिकृती या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहेत, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित ललित कला महाविद्यालयातर्फे गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारातील ललित कला महाविद्यालय कलादालनामध्ये आयोजित 'ललित कला उत्सव' वार्षिक प्रदर्शन-२०२५च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन दि. २७, २८, २९ मार्च आणि १ एप्रिल २०२५ असे चार दिवस सर्वांसाठी खुले असून, कला रसिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२७) सकाळी १२ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक अॅड. लक्ष्मण लांडगे, प्राचार्य मुंजा नरवाडे यांच्यासह स्थानिक व्यवस्थापक समितीचे हिरामण सोनवणे, सागर भालके, सुनंदा पाटील, प्रमोद अहिरराव, सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्राजक्ता मोगल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय काळे यांनी आभार मानले. दरम्यान, यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनात मांडलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींची पाहणी करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतूक केले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन