गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई दि.8 – गुरु तेग बहादुर यांच्या हौतात्म्याच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.

गोरेगाव, नेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले “गुरु तेग बहादुरजींनी देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो.” त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्याग, निःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत गुरुजनांनी संरक्षण केले, तर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला