मनपाचा थकबाकीदार करदात्यांना इशारा. थकबाकी न भरल्यास मालमत्ता होणार जप्त


दिनांक: २०मार्च २०२५ मनपाचा थकबाकीदार करदात्यांना इशारा. थकबाकी न भरल्यास मालमत्ता होणार जप्त.

नाशिक - : नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर संकलन करण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत, कर थकविलेल्या मालमत्ताधाऱ्यांविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवाईचे आढावा घेण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या कर संकलन करण्याच्या प्रयत्नांना चालना, जप्ती वॉरंट बजावलेल्या ८७ नागरिकांनी केला थकबाकीचा भरणा केल्याचे आढळून आले.


४२६ जप्ती वॉरंटमध्ये ८७ नागरिकांची  भरला मालमत्ता कर.  
महानगरपालिकेने शहरातील कर थकबाकीदारांविरुद्ध सहा विभागीय अधिकाऱ्यांद्वारे एकूण ४२६ जप्ती वॉरंट बजावले होते. यातून ८७ नागरिकांनी कर भरून थकबाकीची परतफेड केल्याचे सांगितले. उर्वरित मालमत्ताधाऱ्यांना आता त्वरित कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खत्री यांनी स्पष्ट केले की "ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासह कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कर भरण्याची आपली  जबाबदारी पूर्ण करावी अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला.

पाणीपुरवठा थकबाकीदारांवर कठोर निर्णय  
बैठकीत मार्च अखेरपर्यंत पाणी पट्टी (वॉटर टॅक्स) थकीत ठेवणाऱ्या नागरिकांच्या याद्या तपासल्या गेल्या. या संदर्भात, मोठ्या थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीत उपायुक्त (कर)अजित निकत तसेच सर्व विभागीय अधिकारी उपस्थीत होते. खत्री यांनी सांगितले, कराच्या संकलनामधून महानगरपालिकेचा महसूल वाढून त्यामधून नाशिककर जनतेसाठी मुलभूत सेवा सुविधा पुरविणे शक्य असल्याने सर्वच नागरीकांनी कर भरण्यासाठी सहकार्य करुन शहराचा विकास घडविण्यात आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला