लाचखोर तलाठी विशाखा गोसावी सह खाजगी एजंट एसीबीच्या जाळ्यात
चांदवड :- वारसाहक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उतारावर नोंद करुन देण्याच्या मोबदल्यात ८ हजारांची मागणी करुन तडजोड अंती ४ हजारांची लाच स्वीकारतांना खाजगी एजंट ज्ञानेश्वर बरकले, राहणार (परसुल) चांदवड तालुक्यात तलाठी असलेल्या विशाखा भास्कर गोसावी,हे दोघ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.दोघा लाचखोराविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाई बाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती दिली की तक्रारदार यांची वारसाहक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील शेतजमिनीची सातबारा उतारावर नोंद लावून देण्यासाठी तलाठी विशाखा गोसावी यांच्या वतीने खाजगी एजंट ज्ञानेश्वर बरकले,याने ८ हजारांची लाच मागणी करुन तडजोडीअंती ४ हजारांची लाच पंचासमक्ष स्वीकारली.आरोपीत क्रमांक एक व दोन यांचे विरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ १२ अन्वये कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॅश व्हलू घेण्यात आली आहे.
सापळा कारवाई युनिट नाशिक
तक्रारदार पुरुष वय ३३ वर्षे आरोपीत १) ज्ञानेश्वर एकनाथ बरकले वय ३४ वर्षे व्यवसाय - खाजगी एजंट राहणार परसुल तालुका चांदवड जिल्हा नाशिक आरोपीत क्रमांक २) विशाखा भास्कर गोसावी वय ३७ वर्षे व्यवसाय नोकरी तलाठी,शेलु सजा तालुका चांदवड जिल्हा नाशिक राहणार आर्यावर्त सोसायटी महाराणा प्रताप चौक सिडको नाशिक शहर आरोपीत क्रमांक दोन यांचे अंग झडतीत एक मोबाईल मिळून आला आहे.पुढील तपास चालू आहे.लाचेची मागणी ८ हजार रुपये, तडजोडी अंती ४ हजार रुपये
स्वीकारली लाचेची रक्कम दिनांक - ०३/०३/२०२५ रोजी सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तपास अधिकारी, संतोष पैलकर पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सापळा पथक पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश खैरनार,अविनाश पवार,चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव, आदींच्या पथकाने केली.
Comments
Post a Comment