Posts

Showing posts from March, 2024

कालिदास कलामंदिरात संगीत रंगपंचमी साजरी नवोदित कलाकारांचे सादरीकरण

Image
नाशिक :- ए.एन.कारा ओके क्लब प्रेझेंट लाईव्हआर.डि.बर्मन हिट्स याच्या लोकप्रिय गीताचा "दम मारो दम" या संगीत मैफिलीची दमदार सुरुवात एक मैं और एक तू....या गीताने झाली. कालीदास कला मंदिर येथे विनामूल्य कार्यक्रमात नवोदित नाशिक मधील हौशी गायक कलाकारानी रंगपंचमीच्या पूर्व संध्याकाळी गीत,संगीत रंगपंचमी साजरी केली. या वेळी कुछ ना कहो,ओ हंसीनी,इस मोड से जाते हैं,ये जमीं गा रही है.आदी आर.डि.बर्मन याच्या आवाजातील लोकप्रिय गीते. क्लबचे डायरेक्टर सुनील कोचर व स्वराली चव्हाण याचे सह संजय गाडे,अमोल ताथे,देवेंद्र विभुते,विजय पोळ, बाळकृष्ण तेजाळे, उदय महादास,के.डी. पाटील,जयेश वाघ,के. सुरेश,अनिता खर्डे,अंजली पीचा,दिशा वालके,प्रमिला पाटील,अनिता पगार आदीं कलाकारांनी जुन्या रंगीत आठवणी जाग्या केल्या.प्रत्येक गीताना दर्दी रसिक श्रोत्यांनी टाळ्या, शिट्या वाजवून वंन्समोअर करत गायकांना प्रोत्साहन दिल्याने मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली.या वेळी कालिदास कला मंदिर हाऊस फूल झाले होते. संगीत संयोजन अभिजीत शर्मा यांनी व सह वाद्यवृंद कलाकारांनी...

अध्यात्मिक उन्नतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग शिकणे अती आवश्यक - ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी

Image
नाशिक :- शारीरिक व आध्यात्मिक हे दोन विषय सोबतच असतात मनुष्याचे जीवन या दोन विषयांनीच बनलेले आहे. भौतिकदृष्ट्या आपण एकमेकांना ओळखतो परंतु अध्यात्मिक दृष्ट्या व्यक्ती स्वतःला हा सुद्धा ओळखू शकत नाही ओळखत नाही आपण कोण आहे आपल्यामधील क्षमता काय यापासून मनुष्य अंनभिज्ञ आहे. आज धकाधकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. मात्र आपण सर्वांना एक आवाहन आहे की वेळात वेळ काढून आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा राजयोग शिकणे अती आवश्यक आहे. तेव्हाच शारीरिक व अध्यात्मिक विषयांचा समतोल साधला जाईल. असे प्रतिपादन नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले. डॉ. उज्वल कापडणीस यांच्या प्रयत्नातून एक वर्षा पूर्वी गंगापूर रोड येथील शिवसत्या ग्राउंड व समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे म्युझिकल योगाची सुरुवात करण्यात आली. ब्रह्माकुमारी संस्थेच्या गितांवर आधारित या योगा प्रकाराला अल्पावधीत प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या स्थरातील 400 पेक्षा अधिक लोकांनी या योगा प्रकाराला अंगिकारून आपले शरिरस्वास्थ्य साधले. ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य डॉ. उज्वल...