विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात कला महत्वाची - ॲड. नितीन ठाकरे



मविप्र सांस्कृतिक महोत्सव : मराठमोळ्या लोकगीतांवर थिरकले विद्यार्थी


नाशिक : मविप्र सांस्कृतिक महोत्सवात चौथ्या दिवशी समूहनृत्य सादर करताना मविप्रच्या प्राथमिक विभागाचे विद्यार्थी
नाशिक :- मविप्र संस्था कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असते. त्यासाठीच दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. विद्यार्थी अनोख्या कलाकृती सादर करतात. त्यातूनच भावी कलावंत तयार होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासामध्ये कला ही महत्वाची असते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र सांस्कृतिक महोत्सवाच्या चौथ्या दिवशीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज व सरस्वतीपूजन झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
यावेळी नाशिक ग्रामीण संचालक रमेश पिंगळे, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डी. डी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून नृत्य दिग्दर्शक श्रीकांत वाखारकर, नृत्य दिग्दर्शिका कीर्ती भवाळकर यांनी काम बघितले. 
सलग चौथ्या दिवशी मविप्रच्या प्राथमिक (अभिनव बाल विकास मंदिर) विभागाच्या जिल्हाभरातील २४ संघांनी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंधळी नृत्य, धनगर नृत्य, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य अशा महाराष्ट्रातील विविध विषयांवरील समूहनृत्यांचे सादरीकरण केले. यामध्ये खंडोबाची कारभारीण झाली, बानू धनगरीन, आंबा बाजला गो, मी हाय कोळी, सोरील्या डोली, चला गं मंगळागौरीला, झुंजू मुंजू पहाट अशा विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य केले. प्रा .डॉ. डी. डी. जाधव यांनी प्रास्तविक केले. सविता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत महाबळ यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला