विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
विधानपरिषद सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबर रोजी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
नागपूर, दि. 17 (शिबिर कार्यालय) : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला असून 19 डिसेंबर 2024 रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी 19 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 18 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
Comments
Post a Comment