केटीएचएम महाविद्यालयातील ९ विद्यार्थी भारतीय सेनेत अग्निवीर
नाशिक : भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड झालेल्या मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी आर्मी बॉइज विभागातील नऊ विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉ. एस. एस. काळे व प्राध्यापकवृंद
नाशिक :- मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातील एनसीसी आर्मी बॉइज विभागातील नऊ विद्यार्थ्यांची (केडेट) भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. हे सर्व केडेट नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून आले असून, महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या कामगिरीबद्दल मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल व सर्व संचालक, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. पी.व्ही.कोटमे, डॉ. कल्पना अहिरे, डॉ. वसंत बोरस्ते, आयक्यूएसी समन्वयक डॉ.एन. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना एएनसो लेफ्टनंट डॉ. संभाजी पगार आणि लेफ्टनंट डॉ. योगेश गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांची नावे अशी
किरण मते, गणेश बोराडे, चेतन शिंदे, गौरव सोनवणे, समाधान गायकवाड, समाधान महाले, चेतन बडगुजर, विद्येश पाटील, माधव जाधव.
Comments
Post a Comment