आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत 'मविप्र केबीटी' अजिंक्य


नाशिक : आंतर महाविद्यालयीन नेटबॉल (मुले) स्पर्धेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावणाऱ्या मविप्र संचलित कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंसमवेत मान्यवर

नाशिक : - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळ अंतर्गत नाशिक विभागीय क्रीडा समितीमार्फत आयोजित आंतर महाविद्यालयीन नेटबॉल (मुले) स्पर्धेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मविप्र समाजाचे कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाने सर्व सहभागी संघांवर विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. 
गंगापूर रोडवरील के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्हा परिक्षेत्रातील १५ वरिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा अंतिम सामना कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय विरुद्ध मखमलाबाद महाविद्यालय यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या व उत्कठावर्धक या सामन्यात ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी कु.सार्थक वल्टे, कु.साई मोरे, कु.आयुष्य चव्हाण, कु.ओम वाळके, कु.कौशल संसारे, कु.हर्षल भदाणे, कु.जयेश बालचंदानी व कु.अनिरुद्ध मुंडे यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन तसेच अभिमानास्पद कामगिरी करत स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद जिंकले. 
या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक संचालक डॉ.राजाराम कारे यांचे मार्गदर्शन मिळाले. या खेळाडूंच्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल‎ मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, सर्व संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, प्राचार्य डॉ. एस.आर.देवणे, उपप्राचार्य डॉ.विजय बिरारी, रजिस्ट्रार सृष्टी शिंदे आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. विभागीय स्पर्धेसाठी निवड
विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा दि.१३ व १४ डिसेंबर दरम्यान महात्मा फुले नूतन महाविद्यालय, मिरज येथे होणार असून, या स्पर्धेकरिता कु.सार्थक वल्टे व कु.साई मोरे यांची निवड करण्यात आली आहे.




Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला