मविप्र फिजिओथेरपी महाविद्यालयाचा दीक्षारंभ


नाशिक : मविप्रच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या ‘दीक्षारंभ’ सोहळ्यात सहभागी झालेले मान्यवर आणि विद्यार्थी

नाशिक : - येथील मविप्रच्या फिजिओथेरपी महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ’ सोहळा आणि 'व्हाइट कोट सेरेमनी' मोठ्या उत्साहात महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात पार पडला. 
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अमृत कौर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व नवागतांनी त्यांच्या पालकांसोबत, शिक्षक, विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांसह हजेरी लावली. सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी दिली. प्राचार्या डॉ. अमृत कौर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना कॉलेजच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर व्हाइट कोट सेरेमनीचे आयोजन करण्यात आले. यात ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी नवागतांच्या खांद्यावर व्हाइट कोट ठेवले आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा व्यवसायात प्रवेश केल्याची शपथ घेतली. 
प्रा. डॉ. रुतिका ठाकूर आणि सहायक प्रा. डॉ. निरंजन नाशिककर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सहाय्यक प्रा. डॉ. दीप्ती वाधवा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारंभाचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन