विद्यार्थ्यांनी जिवनामध्ये उच्च ध्येय प्राप्त करावे - डाॅ.सिताराम कोल्हे
मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रीयनेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत व्याख्यानमालेप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डाॅ.सिताराम कोल्हे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र व श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आणि कला व वाणिज्य महाविद्यालय,मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने माजी केंद्रीय कृषीमंत्री,राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना सहाय्यक पोलीस आयुक्त डाॅ.सिताराम कोल्हे "यशाचा मुलमंत्र" या विषयावर बोलत होते.मविप्र संस्थेचे मा.शिक्षणाधिकारी प्रा.डाॅ.अशोकराव पिंगळे यांच्या संकल्पनेतून ही १७ वी व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन होरायझन स्कुल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,पुरुषोत्तम कडलग,व्ही.एन.नाईक संस्थेचे मा. संचालक गोकुळ काकड ,मा.शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले,ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,व्ही.एन.नाईक संस्थेचे विश्वस्त दामोधर मानकर,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,स्कुल कमिटी सदस्य,जेष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,पंढरीनाथ पिंगळे,नामदेव पिंगळे,मधुकर पिंगळे,दिलीपराव पिंगळे,नरेंद्र मुळाणे,साहेबराव पिंगळे,प्रभाकर पिंगळे,चित्रा तादळे,प्राचार्य संजय डेर्ले,कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सचिन राजोळे,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,म्हसरुळ अभिनवचे मुख्याध्यापक संतोष उशीर उपस्थित होते.एन.सी.सी.आर्मी व नेव्हलच्या विद्यार्थ्यांनी तसेच गीतमंचाने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले.मा.शिक्षणाधिकारी डाॅ.अशोकराव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेसंदर्भात सविस्तर माहिती दिली.राजकीय क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार.यानिमित्ताने त्यांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालविला पाहीजे.महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महान नेत्यांची आठवण म्हणुन ही व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली आहे.शाहु,फुले,आंबेडकर यांच्यानंतर यशवंतराव चव्हाण,शरद पवार हे राजकारणातील प्रतिभावंत व्यक्तिमत्व.शरद पवार यांनी राजकारणातील अनेक चढउतार अनुभवले.व्याख्यानमालेच्या योग्य नियोजनाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले यांनी सर्व मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे यांनी शरद पवार यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.संयुक्त महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत पध्दतीने राजकारणाची सांगड घातली.त्यानंतर त्यांचा वारसा शरद पवार यांनी घेतला.शरद पवारांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणाची धुरा आजपर्यंत यशस्वीपणे सांभाळली आहे.व्ही.एन.नाईक संस्थेचे संचालक गोकुळ काकड यांनी आपल्या मनोगतात शरद पवारांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.शरद पवार हे एक अष्टपैलु व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेतला पाहीजे.डी.वाय.एस.पी.पराग जाधव यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.विश्वात सर्वात बुध्दीवान मानव आहेत.त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या चांगल्या,वाईट परिणामांची जाणीव करुन दिली.विद्यार्थ्यांनी जे चांगले आहेत तेच घ्यावे असेही त्यांनी सांगितले.प्रमुख व्याख्याते डाॅ.सिताराम कोल्हे यांनी "यशाचा मुलमंत्र" या विषयावर आपले प्रगल्भ विचार मांडले.विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या.विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीना काही खास आहे.विद्यार्थ्यांनी मोठी ध्येये ठेवावी.जो व्यक्ति छोटी ध्येय ठेवतो तो पाप करतो,असे माजी राष्ट्रपती,डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे विचार आहेत असेही त्यांनी सांगितले.ज्ञानाजर्नाच्या वयात विद्यार्थ्यांचा आपला उद्देश स्पष्ट असावा.स्वतःच्या यशाचे गुपीत त्यांनी मांडले.यु.पी.एस.सी.ते नापास झाले परंतु एम.पी.एस.सी.पहील्याच प्रयत्नात ते पास झाले.अनेक यश अपयशाचे स्वअनुभव त्यांनी कथन केले.विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त व वेळ अतिशय काटेकोरपणे पाळावी.अपयशाने खचुन न जाता प्रयत्न करावे,यश हमखास मिळते.विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे विचारुन अनेक शंकांचे निरसन केले.विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये उच्च ध्येय प्राप्त करावे अहेही त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली.महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ते केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या राजकिय कारकिर्दीविषयी आपले विचार व्यक्त केले.शरद पवार हे एक व्यक्ति नसुन ते एक विचार आहे.महाराष्ट्रातील ते एक अष्टपैलु व्यक्तिमत्व आहे.त्यांना दिर्घायुष्यासाठी त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांनी अतिशय सुरेल आवाजात पसायदान सादर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे,प्रमिला शिंदे,अनिल पगार यांनी तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी केले.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
भारूड 😂
ReplyDelete