केटीएचएम महाविद्यालयात उर्जा संवर्धनाचा जागर
नाशिक : मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त चित्ररथाच्या सहाय्याने ऊर्जा संवर्धनाचा जागर करताना मान्यवर व प्राध्यापकवृंद
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा यांच्या वतीने चित्ररथाच्या सहाय्याने उर्जा संवर्धनाचे प्रबोधन करण्यात आले. यात ऊर्जा संवर्धनासाठी असलेल्या वेगवेगळ्या चित्रफित दाखवण्यात आल्या. ऊर्जा संवर्धनाची सर्वांची जबाबदारी त्यामधून विशद करण्यात आली. ऊर्जा वाचविणे हे ऊर्जा तयार करण्याइतकेच महत्त्वाचे आहे, आणि हे प्रत्येकाचे राष्ट्रीय दायित्व आहे, असा संदेश देण्यात आला. घरामधील वेगवेगळी उपकरणे वापरताना काय काळजी घ्यायची, उपकरण निवडतांना ऊर्जा संवर्धनाची रेटिंग किती महत्त्वाचे आहे. उपकरणांचा वापर झाल्यानंतर ती लगेच बंद करावी. ‘एसी’चा वापर कमीत कमी करावा. घराची रचना करत असताना मुबलक सूर्यप्रकाश कसा येईल, याचा विचार करावा, असा संदेश देण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, कनिष्ठ विभागाचे विज्ञान विभागप्रमुख प्रा. किरण रेडगावकर, डॉ. गणेश मोगल, तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अधिकारी त्याचप्रमाणे कनिष्ठ विभागातील सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment