मविप्र सांस्कृतिक महोत्सव जिल्हास्तरीय स्पर्धांचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन
नाशिक : गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र सांस्कृतिक महोत्सवाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीमध्ये समूहगीत गायन करताना विद्यार्थी
सांस्कृतिक महोत्सवांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : ॲड. नितीन ठाकरे
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून मविप्र संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मविप्र सांस्कृतिक महोत्सवातून आजवर अनेक कलावंत घडले आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून, भावी कलावंतांना एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित मविप्र सांस्कृतिक महोत्सवाच्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, तालुका संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक एस. के. शिंदे, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डी. डी. जाधव, प्रा. डॉ. विलास देशमुख, प्रा. डॉ. अजित मोरे, केटीएचएम प्राचार्य डॉ. एस. एस. काळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मविप्रचे अध्यक्ष ढिकले म्हणाले, विद्यार्थी जी स्वप्ने बघतात आणि ते सत्यात उतरविण्याकरिता प्रयत्न करतात. ते नक्कीच सत्यात उतरतात, असे प्रतिपादन ढिकले यांनी केले. अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केली.
गेल्या १० तारखेपासून मविप्रच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मविप्र सांस्कृतिक महोत्सव सुरु झाला आहे. यातील तालुकास्तरीय प्राथमिक फेऱ्या पूर्ण झाल्या असून, सोमवार (दि.१६) पासून जिल्हास्तरीय अंतिम फेरीला सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी माध्यमिक विभागाच्या समूहगीत गायन स्पर्धा पार पडल्या. प्राथमिक फेरीमध्ये निवड झालेल्या जिल्हाभरातील विविध शाळांमधील ३० संघांनी यात सहभाग घेतला. ‘बलिदानाची भूमी आमूची, त्यागाचा हा देश, प्रिय आमूचा हा भारत देश’, यासारखी देशप्रेमाने ओतप्रोत अशी देशभक्तीपर गीते याप्रसंगी सादर करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सागर कुलकर्णी व ज्ञानेश्वर कासार यांनी काम बघितले.
*आज एकपात्री प्रयोग, समूहनृत्य स्पर्धा*
जिल्हास्तरीय फेरीमध्ये माध्यमिक विभागाच्या स्पर्धांमध्ये मंगळवारी (दि.१७) सकाळच्या सत्रात एकपात्री प्रयोग हा स्पर्धा प्रकार सादर करण्यात येणार आहे तर दुपारच्या सत्रात समूहनृत्य स्पर्धा याप्रसंगी होणार आहेत.
Comments
Post a Comment