विद्यार्थ्यांनो, सीएमध्ये करिअर करा - ॲड. नितीन ठाकरे



नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात आयोजित करियर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, योगेश पंचाक्षरी

केटीएचएम महाविद्यालयात करियर मार्गदर्शन कार्यशाळा

नाशिक :- आपला पाल्य उच्च विद्याविभूषीत पहावयास पालकांना आनंद वाटतो. त्यासाठी सीए हे करिअर निवडणे फायदेशीर आहे. देशामध्ये आर्थिक गुंतवणुकीत वाढ झाली असून, त्याकरिता सीएची मागणीही वाढली आहे. म्हणून वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सीएमध्ये करियर करावे, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
केटीएचएम महाविद्यालयात आयोजित करियर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, विभागप्रमुख प्रा. डी. बी. गावले, योगेश पंचाक्षरी, विशाल वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी पंचाक्षरी म्हणाले कि, ध्येय ठेवल्यास यश नक्कीच साध्य होते. स्वप्नपूर्तीसाठी कष्ट घ्यावे लागतात. शिक्षण घेताना चुकीच्या गाडीत बसू नका. सीए हा पूर्ण वेळ कोर्स नसल्याने विद्यार्थी समांतर अभ्यास करू शकतात. सीए होणे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची इच्छा असते. करिअर करताना आदर्श समोर ठेवा. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना कमी खर्चात सीए होता येते. आव्हानात्मक पातळ्या ओलांडून करिअर बनवावे. त्यासाठी कौशल्य हवे. विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत असल्याचा अभिमान बाळगावा, असेही पंचाक्षरी यांनी सांगितले. 
यावेळी विशाल वाणी म्हणाले कि, जिद्द व चिकाटीने सीए हे नावाचे दोन शब्द नावापुढे लावा. सीए झाल्यानंतर प्रत्येकाला नोकरीची संधी आहे. पैसा हे अंतिम ध्येय असू शकत नाही. आज पेरलेले पाच वर्षानंतर उगवते, हे सीए झाल्यानंतर कळते. करिअरमध्ये सीएला सन्मान असतो. सीए बनण्याचा मार्ग खडतर असतो, पण अवघड नसतो, असेही वाणी यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक बोडके यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात आयोजित करियर मार्गदर्शन कार्यशाळेस उपस्थित विद्यार्थी

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन