इंडस्ट्रियल पाईपिंग टेक्नॉलजी या विषयवर कार्यशाळा संपन्न


नासिक :- महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन व केपीटी पाईप प्रा लि. यांच्या संयुक्त सामाजिक उपक्रमा अंतर्गत हॉटेल सूर्या येथे दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी इंडस्ट्रियल पाईपिंग टेक्नॉलजी या विषयवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी निमा चे अध्यक्ष धनंजय बेळे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच अशफाक कागदी, अध्यक्ष ISHRE, इंजिनिअर हर्षल भामरे अध्यक्ष फायर असोसिएशन, KPT पाईप चे विक्री अधिकारी मंगेश पिंपळे, KPT पाईप चे उत्तर महराष्ट्राचे वितरक श्री मूफदल काचवाला व विशेष अतिथी महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन चे राज्याचे चेअरमन रवी पाटील, हे व्यासपीठावर उपस्थित होते. 

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रस्तावना अल्फा पाईपिंग सिस्टम चे संचालक मूफदल काचवाला, यांनी पुढील प्रमाणे केले. आज भारतीय बाजारपेठेत पाईप व फिटिंगची वार्षिक विक्री 96 लक्ष कोटी आहे. या मध्ये स्टेनलेस स्टील पाईप व अल्यूमीनियम पाईपचा बाजारपेठेतील वाटा 20% आहे. या आयात केल्या जाणार्‍या पाईपच्या जागी स्वदेशी बनावटीचे पीपीआर पाईप हा उत्तम पर्याय आहे. औद्योगिक क्षेत्रात कुठलीही उत्पादन प्रक्रिया करताना विविध यंत्र, संयत्र व उपकरणांचा समावेश असतो. यासाठी ऑईल गॅस व वॉटर ( तेल वायु व पाणी) या मुलभूत गरजा आहेत, यासाठी नेटवर्क पाईपिंग केले जाते. तेल वायु व पाण्यासाठी लोखंडी किंवा इतर धातूचे पाईप वापरले तर ते अल्पायुषी असतात; याचे तांत्रिक कारण आहे पाण्यातील क्षार व वायुतील रासायनिक घटक. पीपीआर पाईप हे विशिष्ट उच्च दर्जाच्या पॉलिमर पासुन तयार केलेले असतात ,त्यामुळे त्याचे सरासरी आयुष्य किमान पन्नास वर्ष असते. जल वायु व तेलाच्या उणे 35 व धन 94 तापमानाचा व रासायनिक घटकांचा परिणाम या पाईप वर होत नाही. याची जोडणी हीटिंग गन द्वारे केली जाते, हे फ्यूजन जोडणी कौशल्या प्रत्येक प्लंबर ने आत्मसात करावे असे आवाहन श्री मूफदल काचवाला यांनी त्यांच्या प्रस्तावनेत केले. 
महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवि पाटील, यांनी त्यांचे मनोगत पुढील प्रमाणे व्यक्त केले. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल ही योजना राबवली. या योजनेमुळे वाडी, वस्ती पर्यंत पेयजल / पाणी उपलब्ध केले. आपल्या महाराष्ट्र राज्यात हे काम साधारण 60% पेक्षा जास्त पुर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात महानगरपालिके पासुन नगरपालिका, एमआयडीसी , ग्रामपंचायत व वाडी वस्ती पर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या 500 मिली मीटर पासुन ते 15 मिली मीटर व्यासाच्या 150 कोटी किलोमीटर चे पाणी पुरवठा करणारे पाईप चे जाळे निर्माण झाले आहे. हे अंतर पृथ्वी ते सूर्य यांच्यातील अंतराच्या 10% आहे. आहे. या 150 कोटी किलोमीटर पाईपलाईन मधून दररोज 1 टीएमसी पाणी पुरवठा केला जातो. त्यात 7% गळती मुळे पाणी वाया जाते. 2% गळती ही युनिफॉर्म प्लंबिंग कोड (युपिसी) प्रमाणे ग्राह्य धरली जाते उर्वरीत 5% गळती होण्यामागे प्रमुख कारण पाईपना येणारा गंज व त्याचा निकृष्ट दर्जाचा जोड़. पीपीआर पाईप जोडणी करताना फ्युजन जॉइन्ट तंत्र वापरले जाते त्यामुळे पाइप व फिटिंग चा जोड हा एकसंघ जोड असतो. 5% गळती थांबविण्यासाठी प्रत्येक परवानाधारक प्लंबरने या पुढे नवीन पाईप जोडणी करताना पीपीआर पाईप वापरावा असे केले तर महाराष्ट्रतील पाणी पुरवठा गळती मुक्त होईल. अग्निशमन संघटनेचे अध्यक्ष  हर्षल भामरे, यांनी कार्यालय, बँक, हॉटेल व विद्यालय या ठिकाणी अग्नीरोधक तुषार पद्धती मध्ये लोखंडी पाइप ऐवजी जंग रोधक पीपीआर पाईप वापरण्याचे आव्हान केले. इश्रे चे अध्यक्ष  अशफाक कागदी,यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वातावरणातील झालेल्या बदलामुळे औद्यगिक इमारती ,कारखाने व व्यावसायिक संकुलात वातानुकूलित यंत्रणा बसवल्या जातात. यामध्ये देखभाल दुरुस्ती व वीजबिल कमी होण्यासाठी पाणी थंड करून वायु झोता मधून फिरवले जाते. थंड पाणी फिरवणार्‍या पाईप मध्ये परांपरिक लोखंडी पाईपचा किंवा तांब्याचा पाईप वापर केला जातो या लोखंडी पाईपला उष्णता रोधक आवरण केले जाते. सर्व आरएसी टेक्निशियनी पीपीआर पाईप वापरला तर लोखंडी पाइपच्या तुलनेत हा पाईप खुप स्वस्त व उष्णता रोधक असेल. पाईप उष्णता रोधक असल्यामुळे कोम्प्रेसर वरील भार 30% कमी होईल पर्यायाने विजबचत होणार. केपीटी पाईप चे विक्री अधिकारी मंगेश पिंपळे, यांनी चित्रफिती द्वारे तांत्रिक माहिती देताना त्यांनी संगितले हा पाईप आज भारतातील उत्पादित केल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या पाईप च्या तुलनेत स्वस्त व टिकाऊ आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धनंजय बेळे यांनी समारोप पर मार्गदर्शन केले ते म्हणाले औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक व यांत्रिक बादल झपाट्याने होत आहे. ये आज नवीन वाटत ते लगेच जून होते आहे. पीपीआर पाईप अग्नी, जल ,वायु या तिन्ही क्षेत्रात उपयुक्त आहे त्यामुळे अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणार्‍या ठेकेदार, प्लंबिंग काम करणार्‍या प्लंबर , एचव्हीएसी इंजीनियर व आर एसी टेक्निशियन यांनी परांपरिक पद्धतीने वापरले जाणार्‍या पाईपच्या जागी भारतीय बनावटीचे पीपीआर पाईप वापरावे ज्यामुळे मेक इन इंडिया उपक्रमाला चालना मिळेल. आपला पैसा आपल्या देशात राहील रोजगार आपल्या देशातील कामगारांना मिळेल शासनाला कर मिळेल परिणामता राष्ट्र संपन्न होईल. सूत्र संचालन श्रीहरी गांगल यांनी केले.आभार प्रदर्शन  मोहमद व्होरा यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमा यशस्वी होण्यासाठी शिवाजी हांडे, वैभव जोशी, सोमनाथ क्षीरसागर, किशोर पाटील,  यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला