प्राचार्य मुंजा नरवाडे यांच्या ‘सोलो एक्झिबिशन’ उत्स्फूर्त प्रतिसाद
नामवंत चित्रकारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची हजेरी
नाशिक :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा प्रसिद्ध चित्रकार मुंजा नरवाडे यांच्या नावाजलेल्या निवडक कलाकृतींचे ‘सोलो एक्झिबिशन’ रविवार (दि.१) पासून मुंबईत सुरु झाले आहे. या एक्झिबिशनला चित्रकलाप्रेमींसह, चित्रपट क्षेत्रातील कलावंत, प्राध्यापक, शासकीय अधिकारी, मविप्र संस्थेतील कलाशिक्षक, अध्यापक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून कलाकृतींचा आस्वाद घेतला.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील गॅलरी फ्रि प्रेस हाउस येथे दि. १ ते १४ डिसेंबरदरम्यान सकाळी ११ ते ७ या वेळेत हे प्रदर्शन सुरु आहे. चित्रकार मुंजा नरवाडे यांनी आजवर साकारलेल्या आणि विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त केलेल्या आकर्षक अशा ३४ निवडक कलाकृती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत.
या प्रदर्शनासाठी अभिनेते स्वप्नील जोशी, महाराष्ट्र राज्य कलासंचालनालयाचे मुख्य निरीक्षक संदीप डोंगरे, उपनिरीक्षक आरती श्रावस्ती, चित्रकार जाकीर शेख, चित्रकार रमेश देशमाने, आंतरराष्ट्रीय चित्रकार एकनाथ गिराम, वसई कला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता ठोंबरे, धुळे कला महाविद्यालयाचे प्रा. अविनाश सोनवणे, मविप्रच्या कलाशिक्षिका प्रा. अर्चना पवार, प्रा. अनिता वाबळे, प्रा. विजय काळे, प्रा. महेश अदबळ, प्रा. विक्रम अंबरे, प्रा. अविनाश आडके आदी मान्यवरांनी हजेरी लावल्याची माहिती चित्रकार प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी दिली. येत्या शनिवारी (दि.१४) या प्रदर्शनाचा समारोप होणार असून, कलाप्रेमींना अजूनही प्रदर्शनाला भेट देण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्राचार्य नरवाडे यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment