शरद पवारांकडून शिकावी संघटन बांधणी - प्रा. अशोक सोनवणे


मविप्रच्या मखमलाबाद महाविद्यालयात शरदचंद्र पवार व्याख्यानमाला

पंचवटी मविप्रच्या मखमलाबाद विद्यालयात राष्ट्रीयनेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना प्रा.अशोक सोनवणे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
पंचवटी :- शरद पवार यांनी राजकिय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कृषी, क्रिडा या क्षेत्रांमध्येही महान कार्य केले आहे. दर्जेदार शिक्षण, सहकार क्षेत्राचे फार मोठे जाळे पवार यांनी उभारले. संघटन बांधणी कशी करावी, हे शरद पवारांकडून शिकावे, असे प्रतिपादन मविप्रचे निवृत्त शिक्षणाधिकारी व व्याख्याते प्रा.अशोक सोनवणे यांनी केले.  
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र, मराठा विद्या प्रसारक समाजाचे मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि मखमलाबाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मखमलाबाद विद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ‘शरद पवार एक व्यक्तिमत्व’ या विषयावर ते बोलत होते. मविप्रचे निवृत्त शिक्षणाधिकारी प्रा.डॉ.अशोक पिंगळे यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती महाले तर प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे, माजी संचालक डॉ.भाऊसाहेब मोरे, ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटी सदस्य पंढरीनाथ पिंगळे,शंकरराव पिंगळे,मधुकर पिंगळे, नरेंद्र मुळाणे,वामनराव पिंगळे, परसराम पिंगळे, प्रभाकर फडोळ, प्राचार्य संजय डेर्ले,कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन राजोळे, उपप्राचार्य राजेंद्र गाडे उपस्थित होते.
एनसीसी आर्मी व नेव्हलच्या विद्यार्थ्यांनी तसेच गीतमंचाने मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेसंदर्भात सखोल माहिती दिली व सर्व मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मविप्र माजी संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी शरद पवारांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. शरद पवारांची स्मरणशक्ती अतीउच्च आहे. ग्रामीण शेतकरी कुटुंब ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदापर्यंतची त्यांची वाटचाल देदिप्यमान आहे. 
यावेळी प्रा. सोनवणे म्हणाले, केंद्रीय कृषीमंत्री असताना पवार यांनी शेतकर्‍यांच्या व महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. १९७२ साली रोजगार हमी कायदा आणला. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिले. पवार यांनी सुरुवातीस स्वतः शेती करुन बाजारात माल विकला. शेतीचे अनेक अनुभव घेतले. शेतकर्‍यांसाठी विविध ठिकाणी बंधारे बांधले. पाणी आडवा,पाणी जिरवा तसेच पाझर तलावांच्या कामामुळे शेतकरी समृध्द झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा सर्व क्षेत्रांमध्ये मोठा विकास केल्याचेही त्यांनी सांगितले.
 अध्यक्षीय भाषणात निवृत्ती महाले यांनी शरद पवारांच्या जीवनकार्याचा व राजकीय प्रवासांचा थोडक्यात आढावा घेतला. ज्येष्ठ शिक्षिका दीपाली कोल्हे, प्रमिला शिंदे, प्रा.विकास थोरात यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ शिक्षिका दीपाली कोल्हे यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षिका प्रमिला शिंदे यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला