वर्धा येथील इतवारा मार्केट स्वच्छतेविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन
वर्धा :- वर्धा नगरपरिषद हद्दीत येत असलेल्या इतवारा बाजार मधील मच्छी मार्केटमध्ये व्यापारी पाच ते सहा ब्लॉक बनवलेले आहे. परंतु त्यापैकी दोन ब्लॉक मध्ये दुकान भरतात व बाकीचे ब्लॉक खाली असल्यामुळे या मार्केट काही लोक तेथे लघुशंकेसाठी जातात त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे. तसेच सदर ब्लॉक मध्ये रात्रीच्या वेळेस टवाळखोर राहतात, दारू पिऊन झोपतात काही दिवसांपूर्वी तिथे बेवारस मृतदेह आढळला होता त्यामुळे इतवारा परिसरातील लोकांमध्ये त्या ब्लॉकमुळे भीतीचे वातावरण आहे.परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने महिला अबालवृद्धांना बाहेर पडण्यास भिती वाटत आहे.याप्रकरणी आमदार डॉ पंकज भोयर १७ नोव्हेंबर २०२४ तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दि.२७/०९/२०२४ रोजी लेखी निवेदन दिलेले आहे परंतु त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर इतवारा परिसरातील नागरिकांनी युसुफ पठाण, अमोल ठाकरे, पठाण मालिन बाई कर्वे. जय सावळे, यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांची भेट घेऊन याप्रकरणी ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी मार्केटच्या रिकाम्या असलेला ब्लॉक ला लोखंडी गेट लावण्यात यावे परिसराची स्वच्छता करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.तसेच आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment