विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून मविप्रतर्फे विविध उपक्रम - शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव
नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये ‘कॅच देम यंग’ चार्टर्ड अकाउंट करिअर कौन्सिलिंग कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर
मराठा हायस्कूलमध्ये ‘कॅच देम यंग’ कार्यशाळेचे उद्घाटन
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये शिकणारा विद्यार्थी फार सुदैवी आहे. येथे कमी वयात सर्व प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून आणि विद्यार्थीहित लक्षात घेऊन संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते, असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये मविप्र माजी विद्यार्थी संघटना व इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कॅच देम यंग’ चार्टर्ड अकाउंट करिअर कौन्सिलिंग कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केटीएचएमचे प्राचार्य प्रा. डॉ. संपतराव काळे, सीए विशाल वाणी, सीए संजीवन तुंबळवाडीकर, सीए उल्हास बोरसे, सीए लीना बंब, प्रा.मोरे, माजी विद्यार्थी संघटना सदस्य प्रशांत निकाळे, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते.
प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचा हस्ते सरस्वती माता आणि अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीए संजीवन तुंबळवाडीकर यांनी आजच्या या व्यावसायिक जगामध्ये सीएची गरज कशी आहे व त्याचे फायदे काय आहे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान शिक्षक सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment